आरोग्य शिबिरास माणगावात प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

आरोग्य शिबिरास माणगावात प्रतिसाद
आरोग्य शिबिरास माणगावात प्रतिसाद

आरोग्य शिबिरास माणगावात प्रतिसाद

sakal_logo
By

८२४५७
आरोग्य शिबिरास माणगावात प्रतिसाद
कुडाळ ः माणगाव येथे आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर असोसिएशन संलग्न श्रीवास लॅबोरेटरी क्लिनिक, माणगाव यांच्या पुढाकाराने व तज्ज्ञ डॉ. दीप्ती कळंगुटकर यांच्या उपस्थितीत झालेल्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा ९२ जणांनी लाभ घेतला. यावेळी रुग्णांना मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. टाळंबा प्रकल्प अध्यक्ष अॅड. किशोर शिरोडकर, माजी उपसभापती आर. के. सावंत, बाळा केसरकर, माणगाव उपसरपंच बापू बागवे, संभाजी ब्रिगेड संघटना तालुकाध्यक्ष प्रसाद नार्वेकर, डॉ. कळंगुटकर, सुप्रिया पाटणेकर, आंतरराष्ट्रीय मानवाधिकार वेल्फेअर सरचिटणीस राकेश केसरकर, महिला सेल अध्यक्षा दर्शना उपाध्यक्ष, मिलिंद धुरी, व्यापारी सेल अध्यक्ष बाळा कोरगावकर, आनंद कांडरकर, कृष्णा सावंत, नामदेव जानकर आदी उपस्थित होते.

८२४५१
रेकॉर्ड डान्स स्पर्धेस हुमरमळात प्रतिसाद
कुडाळ ः अतुल बंगे मित्रमंडळाच्या वतीने हुमरमळा (वालावल) येथील श्री रामेश्वर मंदिरामध्ये महाशिवरात्री उत्सवास शनिवारपासून (ता. ११) प्रारंभ झाला. या उत्सवात दरवर्षीप्रमाणे जिल्हास्तरीय लहान व मोठ्या गटांत रेकॉर्ड डान्स स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. कार्यक्रमाचे उद्‌घाटन सरपंच अर्चना बंगे यांच्या हस्ते झाले. यावेळी उपसरपंच स्नेहल सामंत, ज्येष्ठ साईभक्त सुहास पारकर, शिवसेनेचे अतुल बंगे, मुंबई शिवसेना दादर गटप्रमुख मिलिंद पारकर, युवासेनेचे मितेश वालावलकर, अतुल बंगे मित्रमंडळांचे वैभव मांजरेकर, मयूर प्रभू, योगेश गाळवणकर, निखिल वालावलकर, ग्रामपंचायत सदस्य कांता माड्ये, देवस्थान खजिनदार प्रकाश परब, सुहास पारकर, शेखर परब, परीक्षक रिमा कुडतरकर, आर्लेकर आदी उपस्थित होते.