मळगाव रेल्वेस्थानक परिसराची कर्मचारी, विद्यार्थ्यांकडून स्वच्छता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मळगाव रेल्वेस्थानक परिसराची 
कर्मचारी, विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
मळगाव रेल्वेस्थानक परिसराची कर्मचारी, विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

मळगाव रेल्वेस्थानक परिसराची कर्मचारी, विद्यार्थ्यांकडून स्वच्छता

sakal_logo
By

82455
मळगाव : स्वच्छता मोहिमेत सहभागी रेल्वे कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पदाधिकारी, विद्यार्थी.

मळगाव रेल्वेस्थानक परिसराची
कर्मचारी, विद्यार्थ्यांकडून स्वच्छता
सावंतवाडी ः निरवडे व मळगाव ग्रामपंचायत, रेल्वे कर्मचारी व मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग समाजकार्य विभागाचे विद्यार्थी यांच्या संयुक्त विद्यमाने आज मळगाव रेल्वेस्थानक परिसरात स्वच्छता मोहीम राबविली. रेल्वेस्थानक परिसरात प्रवाशांची वर्दळ असल्याने कचऱ्याचे साम्राज्य पसरते. रेल्वेस्थानक परिसरात साचलेला हा कचरा निरवडे व मळगाव ग्रामपंचायतींच्या पुढाकाराने रेल्वे कर्मचारी व मुंबई विद्यापीठ उपपरिसर सिंधुदुर्ग समाजकार्य विभागाचे विद्यार्थ्यांनी गोळा करून परिसर स्वच्छ केला. या स्वच्छता मोहिमेत निरवडेच्या सरपंच सुहानी गावडे, उपसरपंच अर्जुन पेडणेकर, मळगावच्या सरपंच स्नेहल जामदार, उपसरपंच हनुमंत पेडणेकर, निरवडेचे पंच सदस्य धर्माजी गावडे, जयराम जाधव, सामाजिक कार्यकर्ते सुहास गावडे, रेल्वे कर्मचारी राधाकृष्ण मांजरेकर, रेल्वेचे कर्मचारी, सहकारी, मुंबई विद्यापीठाचे प्रा. अमय निर्मळे, प्रा. पूनम गायकवाड व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
................
82454
महाबळेश्वर : विजयी जल्लोष करताना सावंतवाडी पालिका कर्मचारी.

सावंतवाडी पालिकेची क्रिकेटमध्ये बाजी
सावंतवाडी ः महाबळेश्वर येथे झालेल्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेत येथील पालिकेच्या संघाने बाजी मारली. अंतिम सामन्यात मोहोळ नगरपरिषद संघावर मात करत सावंतवाडी संघाने हे यश मिळविले. या स्पर्धेमध्ये एकूण ५८ नगरपरिषद व पालिकांनी सहभाग दर्शविला. या यशाबद्दल राज्यातील सर्व नगरपरिषदांकडून सावंतवाडी पालिकेचे मुख्याधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन आले.