रत्नागिरी-प्राथमिक शिक्षक संघाचा 17 ला राज्यस्तरीय मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

रत्नागिरी-प्राथमिक शिक्षक संघाचा 17 ला राज्यस्तरीय मेळावा
रत्नागिरी-प्राथमिक शिक्षक संघाचा 17 ला राज्यस्तरीय मेळावा

रत्नागिरी-प्राथमिक शिक्षक संघाचा 17 ला राज्यस्तरीय मेळावा

sakal_logo
By

प्राथमिक शिक्षक संघाचा
१७ ला राज्यस्तरीय मेळावा
रत्नागिरी, ता. १३ ः प्राथमिक शिक्षक संघाची शिक्षण परिषद व राज्यस्तरीय मेळावा रत्नागिरी येथील चंपक मैदानावर १७ फेब्रुवारीला सकाळी १० वाजता होणार आहे. या मेळाव्याला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत, असे संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष कदम यांनी सांगितले.
शिक्षक मेळाव्यात जुन्या पेन्शनचा प्रलंबित प्रश्न प्राधान्याने मांडून सोडविला जाणार आहे. शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची जाचक अट रद्द करण्याचा निर्णय पारित करुन घेण्याची प्रमुख मागणी करण्यात येणार आहे. वरिष्ठ व निवडश्रेणी नियमिततेसाठी स्वतंत्र समिती स्थापन करणे, वैद्यकीय बिलासाठी शिक्षकांना कॅशलेस सुविधा उपलब्ध करून देणे, केंद्रप्रमुख व तत्सम संवर्गाची पदे शंभर टक्के शिक्षकांमधून भरणे, उच्चशिक्षित शिक्षकांना अधिकारीपदी पदोन्नती देणे, महिला शिक्षकांना दोन वर्षाची बाल संगोपन रजा मंजूर करणे इत्यादी महत्त्वाचे प्रश्नावर चर्चा करून ते सोडविण्यासाठी या शिक्षण परिषदेत पाठपुरावा केला जाणार आहे. या मेळाव्यास लाखोंच्या संख्येने महाराष्ट्रातील शिक्षक सहभागी होणार आहेत. या मेळाव्याचे आयोजन राज्य प्राथमिक शिक्षक संघाने केले आहे. या मेळाव्याला राज्यातील प्राथमिक शिक्षक उपस्थित राहणार आहेत.