डॉ. शिवरत्न शेटेंचे २६ ला 
सावंतवाडीत शिवव्याख्यान

डॉ. शिवरत्न शेटेंचे २६ ला सावंतवाडीत शिवव्याख्यान

82498
डॉ. शिवरत्न शेटे

डॉ. शिवरत्न शेटेंचे २६ ला
सावंतवाडीत शिवव्याख्यान
सावंतवाडी, ता. १३ ः येथील सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्या ६ व्या शिवजागराच्या निमित्ताने २६ फेब्रुवारीला सायंकाळी सहाला येथील राजवाड्यात ‘प्रतापगडचा रणसंग्राम’ या शिवव्याख्यानाचे आयोजन केले आहे. या व्याख्यानात प्रसिध्द शिवचरित्रकार तथा हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. शिवरत्न शेटे महाराजांच्या प्रतापगडावरील अजरामर पराक्रमाची आणि अंगावर रोमांच उभी करणारी शौर्यगाथा धगधगत्या शब्दांत मांडणार आहेत.
हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या प्रवासात महाराजांनी प्रतापगडावर झालेले अनेक हल्ले, संकटांचा निधड्या छातीने मुकाबला करत विजयी पताका फडकावली. लोखंडी पहारही वाकवण्याची ताकद असलेल्या विजापूरच्या आदिलशाहीतील बलाढ्य सरदार अफजल खानाचा पराभवही महाराजांनी याच गडावर धैर्य, युक्ती व शक्तीच्या जोरावर केला. इतिहासातील ‘सर्वोत्कृष्ट युद्ध’, असे बिरुद असलेल्या या रणसंग्रामातील बारकावे ऐकण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानतर्फे डॉ. प्रविणकुमार ठाकरे यांनी केले आहे. प्रतिष्ठानच्या माध्यमातून यापूर्वी ‘शिवजागराचे रयतेचे राजे शिवराय आमुचे’, ‘धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज’, ‘राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब’, ‘महाराजांची आग्र्याहून सुटका’, ‘नरवीर शिवा काशीद’ व ‘बाजीप्रभू देशपांडे’, अशी पाच पुष्पे सादर करण्यात आली. याला आबालवृद्धांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्यामुळे हे सहावे पुष्पही ऐतिहासिक राजवाड्यात सिंधुदुर्गवासीयांच्या गर्दीने बहरेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com