पत्रकार वारिशे खून निषेधार्थ १७ ला ‘तोंड बंद’ आंदोलन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पत्रकार वारिशे खून निषेधार्थ
१७ ला ‘तोंड बंद’ आंदोलन
पत्रकार वारिशे खून निषेधार्थ १७ ला ‘तोंड बंद’ आंदोलन

पत्रकार वारिशे खून निषेधार्थ १७ ला ‘तोंड बंद’ आंदोलन

sakal_logo
By

पत्रकार वारिशे खून निषेधार्थ
१७ ला ‘तोंड बंद’ आंदोलन
सिंधुदुर्गनगरी, ता. १३ ः राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या निर्घृण खुनाचा निषेध नोंदविण्यासाठी आणि समाजाच्या संवेदना जागृत करण्यासाठी जिल्ह्यातील संवेदनशील नागरिक आणि स्वयंसेवी संस्थांच्या ‘आम्ही सारे भारतीय’ या मंचाच्या वतीने सिंधुदुर्गनगरी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर ‘तोंड बंद’ आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात कोणाचीही भाषणे होणार नसून आंदोलक शुक्रवारी (ता. १७) सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत तोंडाला काळी पट्टी बांधून मूक आंदोलन करणार आहेत. जिल्हा पत्रकार संघ आणि जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ यांनी या अभिनव आंदोलनाला पाठिंबा दिला असून त्यांच्या सहभागाने आंदोलन होणार आहे.
याबाबतच्या पत्रकात म्हटले आहे, जिल्ह्यातील लोकशाहीप्रेमी कार्यकर्ते, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधींची बैठक काल (ता. १२) ओरोस येथे झाली. बैठकीत आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. पत्रकार वारिशे यांच्या खुनाबद्दल, पत्रकारांवरील वाढत्या हल्ल्यांबद्दल आणि समाजातील वाढत्या असंवेदनशीलतेवर चिंता व्यक्त करण्यात आली.
अॅड. संदीप निंबाळकर यांच्या पुढाकाराने बोलाविलेल्या बैठकीला अॅड. देवदत्त परुळेकर, डॉ. विजयालक्ष्मी चिंडक, सौ. मंगला परुळेकर, अॅड. मनोज रावराणे, सतीश लळीत, अजय कांडर, विनायक ऊर्फ बाळू मेस्त्री, नामानंद मोडक, महेश परुळेकर, लक्ष्मीकांत खोबरेकर, सुनील पाटील, प्रा. विनोदसिंह पाटील, प्रदीप मांजरेकर, भगवान शेलटे, पी. एल. कदम, दौलतअली पटेल, परमेश्वर सावळे आदी उपस्थित होते. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील संविधानप्रेमी, लोकशाहीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे व शक्यतो पांढरे कपडे घालून, सोबत काळी फित घेऊन यावे, असे आवाहन ''आम्ही सारे भारतीय'' या लोकशाहीप्रेमी नागरिकांच्या मंचाने केले आहे.