
-पांढरे पट्टे नसल्याने गतिरोधक धोकादायक
rat१३३०.txt
बातमी क्र. ३० (पान ५ साठी)
फोटो ओळी
rat१३p२९.jpg-
८२५०९
देवरूख : ताम्हाने-तुळसणी मार्गावर टाकण्यात आलेल्या गतिरोधकांवर पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाहीत.
---
पांढरे पट्टे नसल्याने गतिरोधक धोकादायक
ताम्हाने-तुळसणी मार्ग : पट्टे मारण्याची मागणी
देवरूख, ता. १३ ः ताम्हाने-सांगवे-तुळसणी या मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी टाकण्यात आलेल्या गतिरोधकांना पांढरे पट्टे मारण्यात आलेले नाही. त्यामुळे मार्गावरुन वाहतूक करणे वाहनधारकांना धोक्याचे ठरत आहे.
तालुक्यातील ताम्हाने- सांगवे- तुळसणी हा मार्ग पुढे देवरुख- रत्नागिरी मार्गाला जोडला गेला आहे. ताम्हाने-तुळसणी या मार्गालगत शाळा, आरोग्य केंद्र, ग्रामपंचायती, रास्तभाव धान्य दुकाने आहेत. पंचक्रोशीतील ग्रामस्थ, रुग्ण, विद्यार्थी या सेवांचा लाभ घेण्यासाठी या मार्गाने सतत ये- जा करत असतात. त्यामुळे वाहनांची या मार्गावरुन नेहमीच वर्दळ असते. सदरच्या मार्गावर महत्त्वाच्या ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत. मात्र त्यावर पांढरे पट्टे न मारण्यात आल्याने ते वाहन चालकांना अनेकवेळा दिसून येत नाही. संबंधित विभागाने याकडे लक्ष देवून हा पश्न वेळीच मार्गी लावावा, अशी मागणी वाहनधारकांमधून होत आहे.
---
खोदाईमुळे बाजूपट्टी धोकादायक
देवरूख- रत्नागिरी मार्गाला पर्यायी ठरणाऱ्या या सुमारे ८ किमी रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचे काम गेल्या वर्षी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून करण्यात आले. यात बाजूपट्टीचेही काम उत्तम होते. मात्र गेल्या महिन्यात या मार्गाच्या बाजूला केबलसाठी मोठ्या प्रमाणात खोदाई करण्यात आल्याने आता बाजूपट्टीची वाताहात झाली आहे. एकाच वेळी दोन मोठी वाहने गेल्यास रस्त्यावर धुळीचे साम्राज्य पसरते. यामुळे नाराजी व्यक्त होत आहे.
....