Fri, June 9, 2023

-राजापुरात उद्या सदगुरू संत सेवालाल महाराज जयंती उत्सव
-राजापुरात उद्या सदगुरू संत सेवालाल महाराज जयंती उत्सव
Published on : 13 February 2023, 12:28 pm
rat१३५.txt
(पान २ साठी)
उद्या सदगुरू संत सेवालाल महाराज जयंती उत्सव
राजापूर, ता. १३ ः राजापूर तालुका बंजारा बहुद्देशीय समाज सेवा संघातर्फे बुधवारी (ता.१५) सदगुरू संत सेवालाल महाराज यांचा जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने शहरातील पाटीलमळा येथील यशोदिन सृष्टी हॉलमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी ११ वा. जकातनाका ते जवाहरचौक-यशोदिन सृष्टी अशी मिरवणूक, ११.४५ वा. सांस्कृतिक कार्यक्रम, दुपारी १२.३० वा. दीपप्रज्वलन, भोग (होमहवन), सत्कार आदी कार्यक्रम होणार आहेत. या वेळी बंजारा बहुद्देशीय समाज सेवा संघाचे अध्यक्ष धनसिंग चव्हाण, आमदार राजन साळवी, माजी आमदार हुस्नबानू खलिफे, माजी आमदार गणपत कदम, उपविभागीय अधिकारी वैशाली माने, तहसीलदार शीतल जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.