
चिपळूण - पिंपळी खुर्द येथे मदरसा, मशीद परिचय कार्यक्रम
फोटो ओळी
-rat13p31.jpg- KOP23L82525 चिपळूण ः पिंपळी येथे मदरसा, मशिदीची माहिती करून घेताना नागरिक.
------------
पिंपळी खुर्द येथे मदरसा, मशीद परिचय कार्यक्रम
चिपळूण, ता. १३ : मदरसा आणि मशिदीबद्दल असणारे गैरसमज दूर झाले. खऱ्या अर्थाने मशिद आणि मदरसा याचा अर्थ समजला अशी प्रतिक्रिया पिंपळी बुद्रुक येथील तजविजदुल कुरआन मदरसाला भेट देणाऱ्यांनी दिली.
जमअते इस्लामी हिंद चिपळूणच्या वतीने तालुक्यातील पिंपळी बुद्रुकमधील तजविजदुल कुरआन मदरसा येथे मशिद मदरसा परिचय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्ताने सर्वधर्मीय व विविध समाजातील शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातील अनेक लोकांनी भेटी देऊन मदरसा आणि मशिदचा उद्देश समजावून घेतला. या वेळी आमदार शेखर निकम, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कदम, महाराष्ट्र राज्याचा समाजभूषण पुरस्कार प्राप्त शिलभद्र जाधव, प्रा. विनायक होमकलस, माजी नगराध्यक्ष सावित्री होमकलस उपस्थित होते.
जमअते इस्लामी हिंद महाराष्ट्र संदेश विभाग सचिव मौलाना मुहम्मद समी, उप सचिव शेख इम्तियाज, सदस्य डॉ. इकराम खान, प्रोफेसर अमानुद्दीन इनामदार यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी मदरसा प्रमुख उमर धामस्कर, जमाअते इस्लामी हिंद चिपळूणचे अध्यक्ष अब्दुल्ला सहीबोले, सदस्य सैफूद्दीन आसरे, जिल्हा संघटक अशरफ इसफ, फैयाज अडरेकर, मुराद अडरेकर आदींनी प्रयत्न केले.