
जलतरणपटू पूर्वा गावडेचा पत्रकार संघातर्फे गौरव
82539
सिंधुदुर्गनगरी ः येथे जलतरणपटू पूर्वा गावडेचे अभिनंदन करताना जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी.
जलतरणपटू पूर्वा गावडेचा
पत्रकार संघातर्फे गौरव
सिंधुदुर्गनगरी, ता. २८ ः राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झालेल्या पूर्वा गावडे हिचा जिल्हा पत्रकार संघाच्या पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्यांनी भेट घेत अभिनंदन केले.
सिंधुदुर्गनगरी-ओरोस येथील पूर्वा गावडे ही सध्या पुणे बालेवाडी येथे प्रशिक्षक बालाजी यांच्या मार्गदर्शनाखाली जलतरणचे राष्ट्रीय प्रशिक्षण घेत आहे. तीने अलीकडेच ओरिसा येथे झालेल्या राष्ट्रीय वॉटरपोलो स्पर्धेत रौप्य पदक, गुजरात-अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया ज्युनियर जलतरण क्रीडा स्पर्धेत रौप्य पदक पटकावले होते. महाराष्ट्र ऑलम्पिक स्पर्धेत दोन सुवर्ण व दोन कांस्य पदके पटकावली होती. त्यानंतर आता राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही सातत्य राखत यश मिळविले आहे. खेलो इंडिया ज्युनियर जलतरण स्पर्धा आणि महाराष्ट्र मिनी ऑलम्पिक स्पर्धेत यश मिळविल्यानंतर राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही १७ वर्षाखालील वयोगटातून दोन मेडल पटकावत यश मिळविले. तिची राष्ट्रीय जलतरण स्पर्धेसाठी निवड झाली. तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल जिल्हा पत्रकार संघाने कौतुक केले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष उमेश तोरस्कर यांच्यासह परिषद प्रतिनिधी गणेश जेठे, सचिव देवयानी वरसकर, उपाध्यक्ष रमेश जोगळे, बाळ खडपकर, सह सचिव प्रकाश काळे, कार्यकारणी सदस्य संतोष राऊळ, महेश सरनाईक, राजन नाईक, महेश रावराणे, प्रमोद महाडगुत, संदीप गावडे व रश्मी गावडे आदी उपस्थित होते.