लक्ष विचलीत करण्याचा 
खासदार राऊतांचा प्रयत्न

लक्ष विचलीत करण्याचा खासदार राऊतांचा प्रयत्न

06311
नीलेश राणे

लक्ष विचलीत करण्याचा
खासदार राऊतांचा प्रयत्न

नीलेश राणे ः वारीशे मृत्यूप्रकरणी आरोपांना प्रत्युत्तर

सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १३ ः पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यूप्रकरणी राज्याने एसआयटी नियुक्त केली आहे. एसआयटी तपासादरम्यान खऱ्या गुन्हेगारापर्यंत पोहोचू नये, यासाठी खासदार विनायक राऊत हे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे ते या प्रकरणी राणे कुटुंबावर आरोप करीत आहेत. यातून त्यांना कोणाला तरी वाचवायचे आहे, असा आरोप भाजप प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी केला.
सिंधुदुर्ग दौऱ्यावर आलेल्या खासदार राऊत यांनी विविध कार्यक्रमादरम्यान पत्रकार शशिकांत वारीशे मृत्यूप्रकरणी अटक करण्यात आलेला आरोपी हा केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या निकटचा असल्याचा सातत्याने आरोप केला होता. त्याला राणे यांनी आज उत्तर दिले.
श्री. राणे म्हणाले, ‘‘पत्रकार वारीशे अपघाती मृत्यूप्रकरणी पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे; मात्र खासदार राऊत आपल्या भाषणात सातत्याने ही माणसे राणेंची असल्याचे सांगत आहेत. या प्रकरणी आमच्या कुटुंबाचा संबंध जोडण्याचा प्रयत्न करीत आहेत. त्यांना प्रत्येक वेळी राणे दिसतात. ‘राणे एके राणे’ हा त्यांचा एक कलमी कार्यक्रम सुरू आहे. याच्या पलीकडे त्यांना काय येत नाही. खासदाराचे काम काय आहे, हेही त्यांना माहीत नाही. साडेआठ वर्षांत कोकणातील एकही प्रश्न ते सोडवू शकले नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे लक्ष विचलित करून सहानुभूती मिळविण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे.’’
श्री. राणे पुढे म्हणाले, ‘‘पत्रकार वारीशे प्रकरणी पकडण्यात आलेला संशयित नाणार रिफायनरी समर्थक आहे. तो समर्थनार्थ कार्यरत असलेल्या समितीचा सदस्य आहे. आमचा स्वाभिमान पक्ष होता, त्यावेळी आम्ही या रिफायनरीच्या विरोधात होतो. त्यानंतर आम्ही समर्थन दिले. पकडण्यात आलेला संशयित हा समर्थन देणाऱ्या राजकीय व्यक्तींच्या व्यासपीठावर कायम दिसला आहे. ज्या-ज्या नेत्यांनी समर्थन दिले, त्यांच्यासोबत त्याचे फोटो आहेत; मात्र खासदार राऊतांना केवळ राणेच दिसले. बाकीच्यांविरोधात बोलण्याचे धाडस त्यांच्यात नाही. विद्यमान सरकार सत्तेत आल्यानंतर उद्योग खात्याचे मंत्री उदय सामंत झाले; मात्र मी किंवा केंद्रीय मंत्री राणे त्यांना भेटायचे सोडा, साधे फोनवरही कधी बोललो नाही. गेल्या सहा महिन्यांत आमच्यात कोणत्याही प्रकारचे संभाषण नाही. तरीही राऊत यांच्याकडून आमचे नाव जोडले जाते. शासनाने कोणतीही समिती स्थापन करावी. यासाठी आमची तयारी आहे; मात्र चौकशी सुरू असताना त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न खासदार राऊत करीत असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. राऊत यांना विषय वळवायचा असून मुख्य सूत्रधारापर्यंत चौकशी जाऊ द्यायची नाही, असे दिसून येते. बाळासाहेब ठाकरे कधीच खोटे बोलत नसत. त्यांची तशी शिकवण नाही; मात्र खोटे बोलणारे राऊत आपण त्यांचे निष्ठावान असल्याचे सांगतात, हे दुर्दैव आहे.’’
...................
चौकट
आम्ही घाबरत नाही
सुभाष देसाई उद्योगमंत्री असताना मी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे रिफायनरीच्या नावे जमिनीत गैरव्यवहार होत असल्याची तक्रार करीत चौकशीची मागणी केली होती. श्री. देसाई व त्यांच्या पुत्रांविरोधात पुरावेही दिले होते. त्यामुळे आम्ही घाबरत नाही. पत्रकार वारीशे प्रकरणी अटक झालेल्या संशयितांसोबत विनायक राऊत यांचा एका लग्नातील फोटो आहे. विद्यमान उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार राजन साळवी यांच्यासोबतही छायाचित्रे आहेत. याचा अर्थ ते दोषी आहेत, असे म्हणणे माझे नाही; पण खासदार राऊत यांना केवळ राणे दिसत आहेत. बाकीचे दिसत नाहीत, असा आरोप यावेळी श्री. राणे यांनी केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com