देवगडात मत्स्य महोत्सवास खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देवगडात मत्स्य महोत्सवास 
खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
देवगडात मत्स्य महोत्सवास खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

देवगडात मत्स्य महोत्सवास खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

sakal_logo
By

82572
देवगड ः येथील मळईतील मत्स्य महोत्सवावेळी सुरेखा वाळके यांनी मार्गदर्शन केले.

देवगडात मत्स्य महोत्सवास
खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
देवगड, ता. १३ ः येथील देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीच्यावतीने येथील मळई खाडीकिनारी आयोजित केलेल्या मत्स्य (शेलफिश) महोत्सवाला खवय्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. खवय्यांनी तिसरे, कालवे, कोळंबी, खेकडा आदी पदार्थांचा आस्वाद घेतला. तसेच खाडीत नौका विहाराचा आनंदही घेतला.
मत्स्य महोत्सवाचे उद्घाटन मालवण येथील सुरेखा वाळके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा साक्षी प्रभू, जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष प्रसाद पारकर, सचिव नितीन वाळके, देवगड तालुका व्यापारी पर्यटन समितीचे अध्यक्ष प्रमोद नलावडे, तालुका व्यापारी संघाचे अध्यक्ष शैलेश कदम, सचिव संजय मेस्त्री, नगरसेवक रोहन खेडेकर, माजी उपनगराध्यक्ष उमेश कणेरकर, शिवप्रसाद पेडणेकर, अजित टाककर आदी उपस्थित होते. मळई येथील स्थानिक महिलांनी पदार्थ बनवले होते. यावेळी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कालवं, खेकडे, तिसरे तसेच कोळंबी आदी पदार्थांचा आस्वाद खवय्यांनी घेतला. खाडीकिनारी विद्युत रोषणाई केलेले सेल्फी पॉईंट तयार करण्यात आले होते. स्थानिकांचे कलाविष्कार सादर झाले. रात्री खाडीमध्ये विद्युत रोषणाईत सजविलेल्या नौकांमधून जलविहाराचा आनंद पर्यटकांनी घेतला. अशाप्रकारे विविध उपक्रम राबवून पर्यटन वाढीतून रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असे मत सुरेखा व नितीन वाळके यांनी व्यक्त केले. मिलिंद कुबल यांनी सूत्रसंचालन केले. संजय तारकर यांनी आभार मानले.