
-मिऱ्या बंधाऱ्याचे 1500 मीटरचे काम प्रगतिपथावर
पान १ साठी
फोटो ओळी
-rat१३p२२.jpg-
८२४६५
रत्नागिरी- मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याच्या कामाला गती.
मिऱ्या बंधाऱ्याचे काम प्रगतिपथावर
३० डंपर, ७ पोकलॅन, २ क्रेन, कर्मचारी; पूर्णत्वास २ वर्षाची मुदत
रत्नागिरी, ता. १३ : ठेकेदारावर झालेल्या दंडात्मक कारवाईनंतर मिऱ्या धुपप्रतिबंधक बंधाऱ्याचे काम युद्धपातळीवर सुरू झाले आहे. आतापर्यंत पिचिंग करून त्यावर टेट्रापॉड टाकण्याचे काम सुरू आहे. सुमारे १५०० मीटरचे काम प्रगतिपथावर आहे. ३० डंपर, ७ पोकलॅन, २ क्रेन आणि शेकडो कामगार यांच्या मदतीने मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाने आता वेग घेतला आहे. नोव्हेंबर २०२२ पासून दोन वर्षांमध्ये बंधारा पुर्ण करण्याची मुदत आहे.
मिऱ्या गावाच्या सुरक्षेच्यादृष्टीने सुमारे साडेतीन किमीच्या पक्क्या धूपप्रतिबंधक बंधाऱ्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. मिऱ्यावासीयांनी याबाबत आंदोलन केल्यानंतर शासनाने हा बंधारा मंजूर केला. सुमारे १६० कोटी रुपयांचा हा धूपप्रतिबंधक बंधारा आहे. साडेतीन किलोमीटर लांबीचा हा बंधारा २ वर्षात पूर्ण करायचा अवधी आहे. मात्र १० महिन्यांचा कालावधीच्या अनुषंगाने अपेक्षित काम संबंधित ठेकेदाराने केलेले नाही. रत्नागिरीचे पत्तन अभियंत्यांनी याबद्दल संबंधित ठेकेदारावर १८ लाख ८० हजार रूपयांचा दंडात्मक कारवाईचा प्रस्ताव किनारा अभियंत्यांकडे पाठविण्यात आला होता. हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे ठेकेदारावर १८ लाख ८० हजाराची दंडात्मक कारवाईचा करण्यात आल्याची माहिती पत्तन विभागाने दिली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेऊन ठेकेदाराला योग्य समज दिल्यानंतर कामाला वेगाने सुरवात झाली.
पंधरामाड, मिऱ्या, भाटीमिऱ्या, आलाव भागाच्या सुरक्षेच्यादृष्टीने हा बंधारा बांधण्यात येणार आहे. समुद्राचा प्रवाह बदलल्याने या भागा मोठ्या प्रमाणात किनाऱ्याची धुप झाली आहे. समुद्र आणि आता बंधाराही ग्रामस्थांच्या सात-बारा उतारावर आला आहे. पावसाळ्यात या भागाला समुद्राचे पाणी घरात शिरण्याची भिती असते. ग्रामस्थांच्या सुरक्षेच्यादृष्टीने या बंधाऱ्याचे काम वेळेत होणे अपेक्षित आहे. परंतु ठेकेदाराकडुन विलंब झाल्यामुळे कारवाई करण्याची वेळ आली. त्यानंतर कामाने चांगलीच गती घेतील आहे. आतापर्यंत फाउंडेशन तयार होऊन पिचिंग करून त्यावर टेट्रापॉड टाकण्याचे काम सुरू आहे. १५०० मीटरचे पिचिंग आणि टेट्रॉपॉडचे काम प्रगतिपथावर आहे. सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत ३० डंपर, ७ पोकलॅन, २ क्रेन आणि शेकडो कामगारांच्या मदतीने मिऱ्या बंधाऱ्याच्या कामाने गती घेतली आहे.