इस्लामपूर व्यायामशाळा संघ विजेता

इस्लामपूर व्यायामशाळा संघ विजेता

82635

इस्लामपूर व्यायामशाळा संघ विजेता

कणकवलीतील कबड्डी स्पर्धा; यंगस्टार संघ उपविजेता

कणकवली,ता. १४ ः शहरातील यंगस्टार मित्रमंडळच्या यंगस्टार चषक कबड्डी स्पर्धेत इस्लामपूर व्यायामशाळा (जि.सांगली) विजेता तर यंगस्टार कणकवली संघ उपविजेता ठरला. या स्पर्धेत १२ संघ सहभागी झाले. अतिशय चुरशीच्या झालेल्या सामन्यात अखेर ‘इस्लामपूर’ संघाने बाजी मारत यंगस्टार चषकावर नाव कोरले. मान्यावरांच्या हस्ते विजेत्यांना गौरविण्यात आले.
यंदाची स्पर्धा रंगदार ठरली. यात ‘इस्लामपूर’ आणि शिवमुद्रा कौलव यांचा पहिला उपांत्य फेरीचा सामना रंगला. दोन गुणांनी विजयी होत इस्लामपूर संघाने अंतिम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीत शिवभवानी सावंतवाडी आणि यंगस्टार कणकवली यांच्यात सामना रंगला. दोन गुणांनी विजय होत ‘यंगस्टार’ने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामना ‘इस्लामपूर’ आणि ‘यंगस्टार’मध्ये झाला. यामध्ये ‘इस्लामपूर’ने १० गुणांनी विजयी होत यंगस्टार चषकावर नाव कोरले. दरम्यान, स्पर्धेचे उद्‍घाटन नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते झाले. माजी खासदार नीलेश राणे, भाजप युवा नेते विशाल परब यांनी मनोगत व्यक्त केले.
या स्पर्धेत विजेत्या संघाला २५ हजार व चषक, उपविजेता संघास २० हजार व चषक, तर तृतीय आणि चतुर्थ संघास ५ हजार व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट चढाई हृषीकेश कांबळे, उत्कृष्ट पकड सुमीत गावडे, अष्टपैलू खेळाडू सौरभ कुलकर्णी, बोनस किंग शिवलिंग पाटील यांना गौरविण्यात आले. पारितोषिक वितरण समारंभास अध्यक्ष अण्णा कोदे, समीर साई, नंदू उबाळे, अभय खडपकर, पत्रकार रमेश जोगळे, विवेक वाळके, भरत उबाळे, नंदू वाळके, रुपेश परब, अरुण जोगळे, अमिता राणे, प्रियांका कोरगांवकर, रुपेश केळुसकर, रुपेश वाळके, ललित राणे, मेहुल धुमाळे, संजय मालंडकर, व्यंकटेश सावंत, सागर राणे, तुषार मोरे, ऋषी वाळके, अक्षय चव्हाण, मयूर पेडणेकर संतोष जोगळे, नाना कोदे, अभिषेक चव्हाण, रवींद्र सावंत, ऋतिक चौगुले, पंकज पेडणेकर, ओंकार हळदीवे, संदेश आरडेकर, चिन्मय माणगावकर, ओमकार सुतार, बंटी तहसीलदार, परेश वाळके, प्रतीक कडूलकर व पंच म्हणून श्री. वासुरकर, राजेश शिंगनाथ, सुदिन पेडणेकर आदी उपस्थित होते. बाळू वालावलकर यांनी सूत्रसंचालन केले. अण्णा कोदे यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com