
संगमेश्वरमधील गाळ उपशाचा प्रश्न कायम
rat१४३.txt
( टुडे पान २ साठीमेन)
फोटो ओळी
-rat१४p४.jpg -
८२६१४
संगमेश्वर ः शास्त्री नदी गाळाने भरून गेली आहे.
----------
संगमेश्वर परिसराला यावर्षीही पुराचा धोका
गाळ उपशाचा प्रश्न कायम ; बाजारपेठेला नाही वाली
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १४ ः एकीकडे चिपळूणची वाशिष्ठी नदी गाळमुक्त होत असताना येथील शास्त्री व सोनवी नदीतील गाळ उपसा यावर्षीही रखडला आहे. यामुळे यंदाच्या पावसाळ्यातही संगमेश्वरला पुराचा धोका कायम आहे. सात वर्षांपूर्वी गाळ काही प्रमाणात उपसण्यात आला; मात्र तो तसाच ठेवण्यात आल्याने पुन्हा नदीपात्रात गेला आहे.
संगमेश्वर तालुक्यातील महत्वाच्या नद्या म्हणून शास्त्री व सोनवी नद्यांचा उल्लेख केला जातो. या नद्यांतून पूर्वीच्या काळात जलवाहतूक सुरू होती. जलवाहतुकीमुळे बंदरे विकसित झाली होती तसेच संगमेश्वर बाजारपेठेसह माखजन, फुणगूस बाजारपेठेत माल वाहतूक होत होती; मात्र कालांतराने गाळ साचल्याने या नद्यांतील जलवाहतूक बंद झाली. शास्त्री व सोनवी नदीत साचणाऱ्या गाळामुळे संगमेश्वर बाजारपेठेला दरवर्षी पुराचा मोठा धोका निर्माण होतो. सात वर्षापूर्वी रामपेठ ते मापारी मोहल्ला येथील गाळ उपसा करण्यास सुरवात करण्यात आली होती. नद्यांतील गाळ उपसा करून तो रामपेठ येथील रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला होता तसेच त्याचे सपाटीकरण करण्यात आले होते; मात्र पुढील उपसा थांबल्याने हाच गाळ पुन्हा नदीपात्रात जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गतवर्षीच्या पावसाळ्यात संगमेश्वर बाजारपेठेला तीनवेळा पुराने धक्का दिला होता. जवळपास ४ दिवस बाजारपेठेत पाणी होते. यानंतर तरी गाळ उपसा होईल, अशी अपेक्षा होती; मात्र यावर्षीही ती पूर्ण झालेली नाही.
--
कोट
सोनवी आणि शास्त्री नद्यांमधील गाळ उपसा व्हावा यासाठी आम्ही सध्याच्या युती सरकारच्या माध्यमातून प्रयत्नशील आहोत. हे काम नक्की होईल आणि संगमेश्वरला पूरमुक्ती मिळेल.
- संजय कदम, शाखाप्रमुख, शिवसेना, संगमेश्वर
--