आंबोलीत स्वयंरोजगाराचे धडे

आंबोलीत स्वयंरोजगाराचे धडे

आंबोलीत स्वयंरोजगाराचे धडे
आंबोली : येथील ग्रामपंचायतीत आयोजित स्वयंरोजगार मार्गदर्शन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे उदघाटन सरपंच सावित्री पालेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा उद्योग क्रेंद्राचे महाव्यवस्थापक श्री. दामले, जिल्हा उद्योग क्रेंद्राचे व्यवस्थापक श्री. पाटील, प्रकल्प अधिकारी महाराष्र्ट उघोजकता विकास क्रेंद्राचे श्री. गावडे, एम. एस. सिंधू कॉयर इंडस्ट्रीजचे अध्यक्ष श्री. बोरवडेकर, सिंधुदुर्ग जिल्हा बॅंक आंबोलीचे शाखा व्यवस्थापक श्यामसुंदर पोकळे तसेच गेळे सरपंच सागर ढोकरे, आंबोली ग्राणपंचायत सदस्य साक्षी गावडे, बॅंक ऑफ इंडिया आंबोली शाखेचे निवृत्त रोखापाल अनंत गावडे, माजी ग्रामपंचाय़त सदस्य संतोष पालेकर, महिला बचतगट सीआरपी रोहिणी गुरव आदींसह आंबोली, चौकुळ व गेळे ग्रामस्थ उपस्थित होते. शिबिराच्या ठिकाणी सुमारे वीस जणांचे स्वयंरोजगारासाठीचे प्रस्ताव अर्ज पुढील कार्यवाहीसाठी सादर करण्यात आले. स्वयंरोजगारासाठी आवश्यक माहिती देण्यात आली.
...............
वेंगुर्लेत २१ पासून ‘भंडारी चषक’ स्पर्धा
वेंगुर्ले ः सिंधुदुर्ग जिल्हा भंडारी चषकाचे सामने २१ व २२ फेब्रुवारीला वेंगुर्ले कॅम्प येथील क्रीडांगणावर घेण्याचे निश्‍चित करण्यात आले. सर्व तालुक्यांनी आपले संघ संमिती प्रमुखांना संपर्क करून पाठवावेत, असे आवाहन वेंगुर्ले भंडारी ऐक्यवर्धक मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. श्याम गोडकर, महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमण वायंगणकर यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com