चिपळूण-टुडे पान 1 साठी संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

चिपळूण-टुडे पान 1 साठी संक्षिप्त
चिपळूण-टुडे पान 1 साठी संक्षिप्त

चिपळूण-टुडे पान 1 साठी संक्षिप्त

sakal_logo
By

फोटो ओळी
- ratchl१४१.jpg ः श्री देवी करंजेश्वरी KOP२३L८२६६२
------------
श्री देवी करंजेश्वरीचा आज अर्चा महोत्सव

चिपळूण ः शहरातील गोवळकोट, पेठमाप, मजरेकाशी येथील ग्रामदैवत श्री देव सोमेश्वर, श्री देवी करंजेश्वरी देवस्थानतर्फे बुधवारी (ता. १५) फेब्रुवारीला श्री देवी करंजेश्वरीचा अर्चा महोत्सव आयोजित केला आहे. यानिमित्त विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे. श्री देवी करंजेश्वरीचा जन्मोत्सव म्हणून हा अर्चा महोत्सव दरवर्षी साजरा केला जातो. यावर्षीही विविध धार्मिक कार्यक्रम दिवसभर होणार आहेत. बुधवारी सकाळी ८.३० वा. निहार पटवर्धन व आदिती पटवर्धन यांच्या हस्ते श्रींवर अभिषेक, सकाळी ११ वा. महाआरती, दुपारी १२ वा. निहार पटवर्धन व सुरेश शिंदे यांच्यामार्फत महाप्रसाद, सायंकाळी ४ वा. पेठमाप येथील श्री जिव्हेश्वर महिला भजनमंडळाचे भजन, सायंकाळी ५ वा. श्री कालिकामाता महिलामंडळाचे भजन, ६ वा. सार्वजनिक हरिपाठ, ७ वा. सातारा येथील कीर्तनकार हभप धनंजय चव्हाण महाराज यांचे कीर्तन, रात्री १० वा. रत्नागिरीतील समर्थ कृपा प्रॉडक्शनचा ''कोकणचा साज संगमेश्वरी बाज'' हा करमणूक कार्यक्रम होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री देव सोमेश्वर, श्री देवी करंजेश्वरी देवस्थानचे अध्यक्ष अॅड. प्रसाद चिपळूणकर यांनी केले आहे.
--------

ओरीतील मंदिरात आज विविध कार्यक्रम
पावस ः रत्नागिरी तालुक्यातील आदर्श ओरी गावातील श्री ग्रामदेवता मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापनदिनानिमित्त बुधवारी (ता. १५) दिवसभर धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. श्री ग्रामदेवता ओरी या ग्रामदेवता मंदिर वर्धापनदिनी १५ ला सकाळी ९ वाजल्यापासून ते रात्री १० वाजेपर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये श्रींची पूजा, अभिषेक, आरत्या, सत्यनारायण महापूजा, महाप्रसाद, हळदीकुंकू समारंभ, लकी ड्रॉ सोडत, भजन, भोवत्या व आरत्या, अल्पोपाहार, चित्रफित व मान्यवरांचा सत्कार समारंभ, रात्री १०.३० वा. अग्निपथ या प्रसिद्ध नाटकाचा प्रयोग सादर होणार आहे. या सर्व कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन ओरी मधलीवाडी येथील गावकर शंकर शेवडे, सुधाकर घवाळी यांनी ग्रामस्थांच्या वतीने केले आहे.
-------------
गोगटे महाविद्यालयात पोस्टर्स स्पर्धा
रत्नागिरी ः जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय आणि गोगटे- जोगळेकर महाविद्यालयाच्या विद्यमाने गोगटे -जोगळेकर महाविद्यालय येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्षअंतर्गत पोस्टर प्रेझेंटेशन व पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन, पाककला स्पर्धा आयोजित केल्या. यामध्ये बीएसस्सी अभ्यासक्रमामध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. स्पर्धेची संकल्पना आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष २०२३ अशी होती. या स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राचार्य डॉ. पी. पी. कुलकर्णी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुनंदा कुऱ्हाडे यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेसाठी डॉ. मंगल पटवर्धन, प्रा. जी. एस. कुलकर्णी, तंत्र अधिकारी विनोद हेगडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. या वेळी विद्यार्थ्यांनी ज्वारी, बाजरी, वरी, कोद्रा, नाचणी आदी तृणधान्य पिकाविषयी सादरीकरण केले. या वेळी महाविद्यालयाचे वनस्पती शास्त्राचे विभागप्रमुख प्रा. शरद आपटे आदी उपस्थित होते.