मळगाव हायस्कूलचे
विविध स्पर्धांमध्ये यश

मळगाव हायस्कूलचे विविध स्पर्धांमध्ये यश

82683
मळगाव ः येथील हायस्कूलचे यशस्वी विद्यार्थी.

मळगाव हायस्कूलचे
विविध स्पर्धांमध्ये यश
सावंतवाडी ः नॅशनल स्टीम प्रोग्रॅम २०२२-२३ मार्फत कुडाळ हायस्कूल, कुडाळ येथे झालेल्या विविध स्पर्धांमध्ये मळगाव इंग्लिश स्कूल, मळगावच्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले. कुडाळ हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सायन्स कॉम्पिटिशन आयोजित केली गेली. त्यामध्ये मॉडेल मेकिंग कॉम्पिटिशनमध्ये सातवीच्या नारायण मांजरेकर यांनी प्रथम क्रमांक, तर टिंकर कॉम्पिटिशनमध्ये नववीच्या रोहन परब याने द्वितीय क्रमांक पटकावला. समृद्धी राऊळ हिनेही प्रश्नमंजुषा स्पर्धेत सहभाग घेतला. या यशाबद्दल मळगाव ऐक्यवर्धक संघाचे सचिव आर. आर. राऊळ, अध्यक्ष शिवराम मळगावकर, खजिनदार नंदकिशोर राऊळ, स्कूल कमिटी चेअरमन मनोहर राऊळ, मुख्याध्यापक फाले, पर्यवेक्षक कदम आदींनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.
.................
सावंतवाडीतील युवकांचे गोव्यात रक्तदान
सावंतवाडी ः गोवा मणिपाल रुग्णालयामध्ये ब्रेन सर्जरीसाठी अॅडमिट असलेल्या विकास अरोरा (रा. मुंबई) या रुग्णाला तातडीने ''ओ पॉझिटिव्ह'' या रक्तगटाच्या रक्ताची गरज होती. यावेळी युवा रक्तदाता संघटनेचे सदस्य राघवेंद्र चितारी, संदीप निवळे, गौरांग चिटणीस, अवधूत गावडे यांनी मणिपाल गोवा रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान केले. युवा रक्तदाता संघटनेचे अध्यक्ष देव्या सूर्याजी यांनी यासाठी विशेष मेहनत घेतली. निनाद माणकेश्वर यांनी सहकार्य केले. गोवा पर्यटनासाठी आलेल्या या रुग्णाला दोन ब्रेन स्ट्रोक बसले, तेव्हा ब्रेन सर्जरीवेळी तातडीने रक्तपुरवठा करत जीवनदान दिल्याने युवा रक्तदाता संघटनेचे मुंबई येथील अरोरा यांच्या नातेवाईकांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com