तळेरेत आज ‘गीत वीर विनायक’

तळेरेत आज ‘गीत वीर विनायक’

82684
सतीश भिडे

तळेरेत आज ‘गीत वीर विनायक’
तळेरे : देश-विदेशात लोकप्रिय ठरलेला मुंबई येथील सतीश भिडे यांचा ‘गीत वीर विनायक’ कार्यक्रम तळेरे येथे विविध ठिकाणी आयोजित केला आहे. हा कार्यक्रम उद्या (ता. १५) तळेरे आणि खारेपाटण येथे सादर होणार आहे. बुधवारी सकाळी अकराला वामनराव महाडीक माध्यमिक विद्यालय येथे, दुपारी बाराला दळवी महाविद्यालय, तळेरे येथे, दुपारी दोनला खारेपाटण माध्यमिक विद्यालयात, तर सायंकाळी सातला येथील संवाद परिवाराच्या मधुकट्टा येथे हा कार्यक्रम सादर होईल. या कार्यक्रमाला यापूर्वी सुधीर फडके, नानासाहेब धर्माधिकारी, गगनगिरी महाराज, स्वामी विद्यानंद, कसोटीवीर माधव मंत्री, स्वामी पुरुषोत्तमानंद सरस्वती, विद्याधर गोखले, तर दुबई येथे सादर झालेल्या कार्यक्रमाला भारताचे वाणिज्य दूत चाको अशा विविध मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाचा आनंद घेतला. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.
................
मुख्यमंत्री सचिवालय कक्षात १० अर्ज
सिंधुदुर्गनगरी ः लोकाभिमुख प्रशासनात गतिमानता आणण्यासाठी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापनेपासून आतापर्यंत एकूण १० अर्ज दाखल झाले. हे अर्ज त्या त्या कार्यालयात पाठवून निकाली काढण्याचे काम सुरू असल्याची माहिती कक्षाकडून देण्यात आली. सर्वसामान्य माणसाला त्यांचे दैनंदिन आणि स्थानिक प्रश्न सोडविण्यासाठी आपले गाव, शहर सोडून मुंबईला यावे लागू नये, त्यांचा वेळ, पैसा आणि श्रम वाचावेत, या हेतूने २० जानेवारीपासून जिल्हाधिकारी कार्यालयातील पहिल्या मजल्यावरील महसूल शाखेत मुख्यमंत्री सचिवालय कक्ष स्थापित करण्यात आले. २० जानेवारी २०२० ते ३१ जानेवारी २०२३ या कालावधीत जिल्ह्याच्या विविध ठिकाणाहून मुख्यमंत्र्यांना संबोधन करण्यात येणारे अर्ज, निवेदने असे एकूण १० अर्ज प्राप्त झाले. तर कोकण विभागात १७८२ अर्ज प्राप्त झाले.
...................
सेवा सोसायट्यांना प्रस्तावांचे आवाहन
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे शिफारस पत्र घेऊन नावनोंदणी झाल्या आहेत, अशा सेवा सोसायट्यांना कामाची आवश्यकता असल्यास काम मिळण्याबाबतचे प्रस्ताव २४ फेब्रुवारी सायंकाळी ५ वाजेपर्यंत जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र कार्यालयात स्वहस्ते सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त यांनी केले आहे.
..................
महिला लोकशाही दिन २० फेब्रुवारीला
सिंधुदुर्गनगरी : फेब्रुवारीचा जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन सोमवारी (ता. २०) जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी ११ ते १ या वेळेत आयोजित केला आहे. समस्याग्रस्त व पीडित महिलांनी शासनाने उपलब्ध करून दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी केले आहे. अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, सिंधुदुर्गनगरी ओरोस येथे उपलब्ध आहेत.
.................
सनियंत्रण समितीची शुक्रवारी सभा
सिंधुदुर्गनगरी : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण (दिशा समिती) समितीची त्रैमासिक सभा खासदार विनायक राऊत यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (ता. १७) सकाळी अकराला आयोजित केली आहे, अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकस यंत्रणाचे प्रकल्प संचालक डॉ. उदय पाटील यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com