ओरोस इंग्लिश स्कूलला ५० खुर्च्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ओरोस इंग्लिश स्कूलला ५० खुर्च्या
ओरोस इंग्लिश स्कूलला ५० खुर्च्या

ओरोस इंग्लिश स्कूलला ५० खुर्च्या

sakal_logo
By

82704
सिंधुदुर्गनगरी : न्यू इंग्लिश स्कूल प्रशाळेला खुर्च्या प्रदान प्रभाकर सावंत, अशोक रायबान आदींसह माजी विद्यार्थी.

ओरोस इंग्लिश स्कूलला ५० खुर्च्या
ओरोस ः धी कसाल पंचक्रोशी शिक्षण संस्था कसाल संचलित न्यू इंग्लिश स्कूल, ओरोस-सिंधुदुर्गनगरी या प्रशालेच्या २००९-१० च्या दहावी वर्गाच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रशाळेला ५० प्लास्टिक खुर्च्या भेट दिल्या. माजी विद्यार्थ्यांचा पहिला स्नेहमेळावा नुकताच झाला. त्यावेळी खुर्च्या प्रदान करण्यात आल्या. यावेळी संस्थेचे संचालक प्रभाकर सावंत, मुख्याध्यापक अशोक रायबान, माजी मुख्याध्यापक गुरुदास कुसगावकर, शिक्षक विजयकुमार गोसावी, संजीव राणे, अशोक गीते, उदय सावंत, अनंत साईल, आर्या बागवे, तेजस्विनी पाटील, रतन कसालकर, संजय सावंत, अरविंद दळवी, गजानन मुरमुरे, राजेंद्र शिंगाडे, गौतम कदम आदींसह माजी विद्यार्थी अल्पेश रासम, तुषार सावंत, कमलेश वंजारे, सुहेल शेख, पृथ्वीराज लोणे, ओंकार राऊळ, ओंकार कुडाळकर, रोहित कुडाळकर, अमित डोंगरे, दत्ताराम सुद्रिक, सिद्धेश परब, रेखा पांचाळ, उल्का मेस्त्री, कविता परब, दीक्षा परब, श्रद्धा राऊळ, सुलभा चव्हाण आदी उपस्थित होते.
................
82705
कोंडुरा ः चित्रकला शिक्षक सावंत यांचे अभिनंदन करताना मुख्याध्यापक विद्याधर देसाई आदी.

आरोस हायस्कूलचे रेखाकला परीक्षेत यश
बांदा ः आरोस पंचक्रोशी विद्या विकास हायस्कूल, आरोसने शासकीय रेखाकला परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविले. एलिमेटरीसाठी १९ मुले प्रविष़् झाली होती. सर्व मुले उत्तीर्ण होऊन शंभर टक्के निकाल लागला. ए श्रेणीत ८ मुले, बी श्रेणीत ११ मुलांनी यश मिळविले. इंटरमिजिएटमध्ये सर्व १३ मुले उत्तीर्ण झाल्याने शंभर टक्के निकाल लागला. ए श्रेणीत १, बी श्रेणीत ५ व सी श्रेणीत ७ मुलांनी यश प्राप्त केले. यशस्वी विद्यार्थ्यांसह कलाशिक्षक सावंत यांचे संस्थाध्यक्ष राहिदास सावंत, उपाध्यक्ष बाळा परब, सचिव राजन नाईक, मुख्याध्यापक विद्याधर देसाई आदींनी अभिनंदन केले.