संक्षिप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

संक्षिप्त
संक्षिप्त

संक्षिप्त

sakal_logo
By

rat१४३०.txt

(पान २ साठी, संक्षिप्त)

महाजन स्मृतीप्रतिष्ठानतर्फे आरोग्य तपासणी

दाभोळ ः मुरुड येथे (कै.) कृष्णामामा महाजन स्मृतिप्रतिष्ठानच्या माध्यमातून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. मुरुड येथील प्रसिद्ध नाडीतज्ञ नागूअण्णा बिवलकर आयुर्वेद चिकित्सा आणि नाडीपरीक्षेद्वारे रुग्णांचे अचूक निदान करत असल्याने त्यांच्याकडे देशभरातून अनेक रुग्ण उपचारासाठी येत होते. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन मुरुड येथील एन. के. वराडकर हायस्कूल येथे करण्यात आले होते. शिबिरामध्ये नेत्रतपासणी, दंतचिकित्सा, स्त्रीरोग तपासणी, हिमोग्लोबिन टेस्ट आणि सामान्य चिकित्सा इ. प्रकारच्या आरोग्य तपासणीचा समावेश होता. डॉ. धामणकर, डॉ. पिलणकर, डॉ. गरंडे, डॉ. राठोड यांनी मार्गदर्शन केले. प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष मिहीर महाजन यांनी प्रास्ताविकात म्हणाले, ज्यांची जयंती आहे ते नागूअण्णा आणि ज्यांच्या प्रतिष्ठानने कार्यक्रम आयोजित केला.
-

दापोलीत शिवधनुष्य सांस्कृतिक युवा महोत्सव

दाभोळ ः दापोलीचे आमदार योगेश कदम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) दापोली तालुका यांच्यावतीने शिवधनुष्य सांस्कृतिक युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती दापोली येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली. आमदार योगेश कदम यांचा १८ फेब्रुवारीला वाढदिवस आहे. जिल्ह्यातील कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ व १९ फेब्रुवारीला दापोली शहरातील आझाद मैदान (शिवस्मारकासमोर) येथे हा महोत्सव होणार आहे. त्यात नृत्यस्पर्धा (एकेरी) व समूहनृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी रोख पारितोषिक व स्मृतीचिन्ह देऊन विजेत्या कलाकारांचा सन्मान करण्यात येणार आहे. याच महोत्सवात व्यक्तिमत्व व सौंदर्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेसाठी प्रसाद रेळेकर, निखिल परब, स्वप्नील परब, मंदार केळकर यांच्याकडे १६ फेब्रुवारीपर्यंत नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
-

फोटो ओळी
-rat१४p२४.jpg ः
८२७२९
देवरूख ः शहीद स्मारकस्थळावर अभिवादन करताना कार्यवाह फाटक, उपाध्यक्ष भोसले, ॲड. प्रभूदेसाई, प्राचार्य. डॉ. तेंडोलकर तर दुसऱ्या छायाचित्रात आर्मी व नेव्ही युनिटचे छात्रसैनिक व सबलेफ्टनंट प्रा. भाट्ये मानवंदना देताना.
-----
देवरुखातील शहीद स्मारक स्थळावर अभिवादन

देवरूख ः देवरूख शिक्षण प्रसारक मंडळाच्या शहीद स्मारकस्थळी पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना उपस्थितांनी अभिवादन करून आदरांजली अर्पण केली. १४ फेब्रुवारी, २०१९ ला जम्मू-श्रीनगर महामार्गावर ७८ बसमधून सुमारे २६०० केंद्रीय राखीव पोलिसदलाचे (सीआरपीएफ) जवान प्रवास करत होते. पुलवामा येथे जवानांच्या गाड्यांचा ताफा पोहोचला असता, रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या कारने सीआरपीएफच्या ताफ्यातील वाहनांना धडक दिली. या वेळी स्फोट होऊन सीआरपीएफचे ४० शूरवीर शहीद झाले. या हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताच्या शूर जवानांनी बालाकोट सर्जिकल स्ट्राईकच्या रूपाने प्रत्युत्तर दिले. या सर्व आठवणींना उजाळा मिळण्याचे निमित्त होते पुलवामा शहीद दिवसाचे. शहीद स्मारक स्थळावर माजी सैनिक अमर चाळके, संस्था उपाध्यक्ष कुमार भोसले, कार्यवाह शिरीष पाठक, ॲड. वेदा प्रभुदेसाई, प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी अभिवादन केले. आर्मी व नेव्हीचे छात्रसैनिक, सबलेफ्टनंट प्रा. उदय भाट्ये आणि सीटीओ प्रा. सानिका भालेकर यांनी मानवंदना दिली.