
कोळथरे किनाऱ्यावर कासवांची सर्वाधिक 34 घरटी
rat१४३१.txt
(पान २ साठी, अॅंकर)
फोटो ओळी
-rat१४p२९.jpg-
८२७५१
कोळथरे : घरट्यात संरक्षित केलेली कासवाची अंडी.
--
कोळथरे किनाऱ्यावर कासवांची सर्वाधिक घरटी
कासव महोत्सव भरवणार ; ३ हजार ४५० अंड्यांचे संरक्षण
दाभोळ, ता. १४ ः दापोली तालुक्यातील कोळथरे किनाऱ्यावर यावर्षी सर्वाधिक ३४ कासवांची घरटी संरक्षित करण्यात आली आहेत. यामध्ये ३ हजार ४५० अंडी असून १० ते ३० मार्च या कालावधीत पिल्ले बाहेर येण्याची शक्यता आहे. या कालावधीत येथे कासव महोत्सव आयोजित करण्यात आल्याची माहिती कोळथरे पंचक्रोशी विकास मंडळाचे अध्यक्ष दीपक महाजन यांनी दिली.
कोळथरे गावाला स्वच्छ सुंदर छोटासा समुद्रकिनारा आहे. गावातील आई गो. म. विद्यामंदिर आणि ग्रामस्थ मिळून दरवर्षी समुद्रकिनारा स्वच्छता मोहीम राबवतात. सुमारे २० वर्षापूर्वी कोळथरे येथील अगोमचे महाजन, ग्रामस्थ आणि सह्याद्री निसर्गमित्र संस्था यांनी कासव संवर्धन मोहीम राबवण्यास सुरवात केली. गेली काही वर्षे वनविभागामार्फत कासव संवर्धन प्रकल्प हाती घेतला आहे. वनरक्षक सूरज जगताप, वनपाल सावंत, वनपरिक्षेत्र अधिकारी वैभव बोराटे, विभागीय वनाधिकारी दीपक खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली गावातील प्रवीण तोडणकर आणि तेजस तोडणकर हे कासव संवर्धनाचे काम करत आहेत.