
ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये माफक दरात चाचणी
rat१४३४.txt
बातमी क्र..३४ (पान २ साठी)
(टीप - जाहिरातदार आहेत)
ऑन्को लाईफ केअर कॅन्सर सेंटरमध्ये चाचणी
चिपळूण, ता. १४ ः येथील ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटर कोकणातील कॅन्सर रुग्णांना आधुनिक तंत्रज्ञानासह अनुभवी डॉक्टराच्या साथीने उपचार सेवा देण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहे. नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी चिपळूण येथील ऑन्को लाइफ केअर कॅन्सर सेंटरने ही अनोखी संकल्पना राबवली आहे. यात कोकणात राहणाऱ्या कॅन्सरग्रस्तांकरिता या केंद्रात परवडणाऱ्या दरात वैद्यकीय चाचणी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कॅन्सरवरील वैद्यकीय उपचार महागडे असल्याने बहुतांश रुग्ण उपचारासाठी डॉक्टरांकडे येत नाहीत. वेळीच उपचार न झाल्यास कॅन्सर बळावतो. अशावेळी रुग्णावर उपचार करणं डॉक्टरांसाठी अवघड होतं. वेळेवर उपचार न झाल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन ऑन्को लाईफकेअर कॅन्सर सेंटरने चिपळूणमध्ये रुग्णांना परवडणाऱ्या दरात वैद्यकीय उपचार व निदान उपलब्ध करून दिले आहेत. या केंद्राद्वारे कॅन्सरचं लवकर निदान व्हावं यासाठी पेटस्कॅन, सीटीस्कॅन आणि मॅमोग्राफी चाचणी होणार आहे. या व्यतिरिक्त सर्व प्रकारच्या वैद्यकीय चाचण्यांवर २० टक्के सूट देण्यात आली आहे. याशिवाय पिवळ्या रंगाच्या रेशनकार्ड धारकांना महात्मा जोतिबा फुले आणि भगव्या रंगाच्या रेशनकार्ड धारकांसाठी जनआरोग्य योजनेतंर्गत कॅन्सर रुग्णांवर उपचार करण्यात येणार आहे.