काळसेकर कुटुंबीयांना ‘आभाळमाया’चा हात

काळसेकर कुटुंबीयांना ‘आभाळमाया’चा हात

82744
काळसे ः येथील काळसेकर कुटुंबीयांना आभाळमाया ग्रुपकडून मदतीचा हात देण्यात आला.

काळसेकर कुटुंबीयांना ‘आभाळमाया’चा हात

ग्रुपच्या माध्यमातून मदत; चार ब्लड कार्डसह ४५ हजार सुपूर्द

मालवण, ता. १४ : काळसे-हुबळीचा माळ येथे ९ फेब्रुवारीला झालेल्या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या रुक्मिणी पांडुरंग काळसेकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन वराड-कट्टा येथील आभाळमाया ग्रुपतर्फे ४५ हजार रुपये रोख रक्कम मदत म्हणून दिली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या दिव्या काळसेकर यांच्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज पडल्यास चार ब्लड कार्ड देण्यात आली.
काळसे येथील अपघातात रुक्मिणी काळसेकर यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची सून दिव्या काळसेकर गंभीर जखमी झाली. या दुर्घटनेमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातात आई गमावलेल्या आणि पत्नी जायबंदी झालेल्या दीपक काळसेकर यांची घरची आर्थिक परिस्थिती हलाखीची असून पत्नीच्या पायावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना आर्थिक मदतीची गरज आहे. याबद्दल काळसे गावातील रहिवासी व पोलिस खात्यातील अधिकारी प्रमोद काळसेकर यांनी सोशल मीडियावरून काळसेकर कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळावी म्हणून आवाहन केले होते.
या आवाहनाबाबत ‘आभाळमाया ग्रुप’चे राकेश डगरे यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने ग्रुपवर सदस्यांना आर्थिक मदतीचे आवाहन केले. डगरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अनेक सदस्यांनी आपापल्या परीने आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. ग्रुपच्या सदस्यांनी जमा केलेली ४५ हजार रुपयांची रोख रक्कम आणि दिव्या काळसेकर यांच्या शस्त्रक्रियेसाठी रक्ताची गरज पडल्यास लगेच उपलब्ध व्हावीत म्हणून चार ब्लड कार्ड काळसे येथे जात मृत रुक्मिणी काळसेकर यांचे मुलगे किशोर आणि दीपक यांच्याकडे सुपूर्द केली आणि कुटुंबीयांचे सांत्वन केले. यावेळी आभाळमाया ग्रुपचे अॅड. हृदयनाथ चव्हाण, भाई वेंगुर्लेकर, शुभम मसुरेकर, नितीन शेट्ये, समीर रावले, गणेश मोरजकर, सागर चव्हाण, अमित चव्हाण, प्रवीण मिठबावकर, प्रणित चव्हाण, अमोल गोसावी, राकेश डगरे आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com