
सेवालाल महाराज जयंतीनिमित्त कुडाळमध्ये आज कार्यक्रम
८२७५२
सेवालाल महाराज जयंतीनिमित्त
कुडाळमध्ये आज कार्यक्रम
कुडाळ ः श्री संत सेवालाल महाराज यांची जयंती उद्या (ता.१५) सकाळी ९.३० ते दुपारी ३ या वेळेत येथील पंचायत समितीच्या बाजूच्या पटांगणावर साजरी होणार आहे. वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना व संत सेवालाल महाराज जयंती उत्सव मंडळ, कुडाळ यांच्यातर्फे आयोजन केले आहे. सर्व अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन तहसीलदार अमोल पाठक, गट विकास अधिकारी विजय चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे. कार्यक्रम असे ः सकाळी ९ वाजता कलश पूजनासाठी रॅली, ११ वाजता भोग व पुजा, ११.३० ते दुपारी १२.३० मान्यवरांचा सत्कार व सर्व अधिकारी कर्मचारी सन्मान सोहळा. १२.३० ते १.३० प्रमुख पाहुण्यांचे मार्गदर्शन, १.३० ते ३ महाप्रसाद, ३.३० ते ६ सांस्कृतिक व मनोरंजन कार्यक्रम, रात्री ८ वाजता भजन आदी कार्यक्रम होणार आहेत. याचा लाभ घेण्याचे आवाहन वसंतरावजी नाईक अधिकारी कर्मचारी संघटना सिंधुदुर्ग व संत सेवालाल महाराज जयंती उत्सव मंडळ, कुडाळ (भैरववाडी) यांनी केले आहे.
ृृृृृ-----
मालवणात आज नियोजन सभा
मालवण : हिंदू नववर्ष स्वागत यात्रा चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढी पाडव्याच्या दिवशी म्हणजेच २२ मार्चला काढण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर स्वागत यात्रेचे नियोजन करण्यासाठी उद्या (ता. १६) भरड दत्त मंदिर येथे सायंकाळी ४ वाजता बैठक आयोजित करण्यात आली आहे. विविध सामाजिक संस्था, मंडळे, देवस्थान समिती या सर्वांच्या प्रतिनिधींनी या बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन भाऊ सामंत यांनी केले आहे.