
काळसेतील शिबिरात 36 जणांचे रक्तदान
८२७५५
काळसेतील शिबिरात
३६ जणांचे रक्तदान
सकाळ वृत्तसेवा
मालवण, ता. १४ : बाल सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळ काळसे धामापूर आणि सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठान यांच्यावतीने पूर्ण प्राथमिक शाळा, काळसे-धामापूर येथे आयोजित रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. यावेळी ३६ जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
धामापूर सरपंच मानसी परब आणि काळसे सरपंच विशाखा काळसेकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून रक्तदान शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी काळसे उपसरपंच अनिल सरमळकर, सदस्य खुशी राऊळ, माजी सभापती राजेंद्र परब, सिंधू रक्तमित्र प्रतिष्ठानचे जिल्हा सचिव किशोर नाचणोलकर, बाल सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळाचे अध्यक्ष अमोल परब, उद्योजक महेश परब, जिल्हा रुग्णालय रक्तपेढीच्या डॉ. पद्मश्री हळदणकर, डॉ. प्रांजल परब, शिक्षक महेश कदम, हर्षद नाईक, सिद्धेश काळसेकर, मधुसुदन साळसकर, धामापूर ग्रामपंचायत सदस्य प्रशांत गावडे, प्रशांत परब, प्रवीण परब आणि मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते. धामापूर सरपंच परब यांनी सर्वप्रथम रक्तदान करून शिबिराचा शुभारंभ केला. यावेळी रक्तदान करणाऱ्या सर्व रक्तदात्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. हे शिबिर यशस्वी होण्यासाठी बाल सांस्कृतिक कला, क्रीडा मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.