
चिपळूण-महिनाभरात वाशिष्ठी पुलापर्यंत चौपदरीकरण पूर्ण
फोटो ओळी
-ratchl१४२.jpg ःOP२३L८२६७३
चिपळूण ः परशुराम घाटात सुरू असलेले डोंगरकटाईचे काम.
महिनाभरात वाशिष्ठी पुलापर्यंत चौपदरीकरण पूर्ण
परशुराम घाटात वेगाने काम सुरू ; मार्चअखेरपर्यंत एकेरी मार्ग सुरू करण्यासाठी प्रयत्न
चिपळूण, ता. १४ ः मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाअंतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वात मोठ्या उड्डाणपुलाच्या कामासह अन्य काँक्रिटीकरणालाही वेग आला आहे. विशेषतः परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम जोरदार सुरू असून मार्चअखेरपर्यंत काँक्रिटीकरणाचा एकेरी मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यातील बहुतांशी टप्पा १५ मार्चपूर्वी गाठण्याचा प्रयत्न ठेकेदार कंपनीमार्फत सुरू आहे. महिनाभरात चिपळूणच्या वाशिष्ठी पुलापर्यंत चौपदरीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.
महामार्गावरील चौपदरीकरणाच्या कामाला हळूहळू गती येऊ लागली आहे. विशेषतः परशुराम ते आरवलीदरम्यानच्या कामाचा वेग वाढला आहे; मात्र अजूनही काही भागातील जागा ताब्यात घेणे, मोऱ्या व गटारे उभारणे अशी कामे सुरू आहेत. सुमारे ३६ किलोमीटरच्या अंतरातील हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. कापसाळ, कामथे घाट, कोंडमळा व सावर्डे या भागात काही ठराविक अंतराचे काँक्रिटीकरणाचे काम शिल्लक आहे.
परशुराम घाटातील चौपदरीकरणावर अधिक लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. पावसाळ्यापूर्वी घाटातील चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठीही अतिशय वेगाने प्रयत्न सुरू केले आहेत. येत्या १५ मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने एका मार्गावरचे काँक्रिटीकरण पूर्ण करून मार्चमहिना अखेर चिपळूणच्या वाशिष्ठी पुलापर्यंत चौपदरीकरणाचे काम जोडले जाणार आहे. त्यासाठी कल्याण टोलवेज व ईगल कंट्रक्शनची मोठी यंत्रणा येथे काम करत आहेत. परशुराम घाटातील एकेरी मार्ग सुरू झाल्यानंतर दुसऱ्या मार्गाचेही काम तितक्याच वेगाने करण्याची तयारी ठेकेदार कंपनीने केली आहे. वालोपे येथील ६०० मिटरचे शिल्लक काँक्रिटीकरणही तातडीने केले जाणार आहे.
कोट
उपअभियंता प्रकाश निगडे यांची बदली
राष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता प्रकाश निगडे यांची नुकतीच पुणे येथे बदली झाली आहे. निगडे यांनी गेले दोन वर्षे चौपदरीकरणाच्या कामात विशेष लक्ष दिले होते. सर्व्हिस रोड व चौपदरीकरणातील अन्य समस्या सोडवण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. चिपळूण-गुहागर बायपास रस्त्याचा ''मास्टर प्लॅन''ही त्यांनी तयार करून मंजुरीसाठी सादर केला. त्यात आता पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करत असतानाच त्यांची बदली झाली आहे. त्यामुळे ही जबाबदारी तूर्तास प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे.