
साडवली-डी-कॅड कला महाविद्यालयात किल्ले बनवा स्पर्धा
डी-कॅड कला महाविद्यालयात किल्ले बनवा स्पर्धा
साडवली, ता. १४ ः देवरूख डी-कॅड कला महाविद्यालयात संकल्पन २०२३ वार्षिक कलाप्रदर्शनाच्या निमित्ताने खुल्या गटात १८ व १९ ला किल्ले बनवा स्पर्धा होणार आहे. १८ ला किल्ला बनवणे, १९ ला रंगकाम करणे अपेक्षित आहे. सकाळी १० ते ५ वेळ असून दगड, माती, पाणी पुरवण्यात येणार आहे. एका गटात लहान-मोठे मिळून एकूण आठजण सहभागी होऊ शकतात. वयाची अट नाही. किल्ला बनवताना रासायनिक तसेच प्लास्टिक, थर्माकोल या वस्तू वापरता येणार नाहीत. कोणता किल्ला आहे त्याची जुजबी माहिती लिहिली गेली पाहिजे. तीन विजेत्यांना अनुक्रमे २ हजार रु., १५०० रु., १ हजार व सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र दिले जाणार आहे. डी-कॅडच्या आवारात ही स्पर्धा होणार आहे. जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य रणजित मराठे यांनी केले आहे.