शिक्षकाचा आकस्मिक मृत्यू

शिक्षकाचा आकस्मिक मृत्यू

82779
सागर पाटील

शिक्षकाचा आकस्मिक मृत्यू
सावंतवाडी, ता. १४ ः आंबेगाव येथील शाळा नंबर १ चे शिक्षक सागर आप्पासो पाटील (वय ३६) यांचे आज पहाटे हृदयविकाराच्या झटक्याने सावंतवाडी-भटवाडी येथील राहत्या घरी निधन झाले. ते मूळचे गिजवणे-गडहिंग्लज येथील आहेत. त्यांना अचानक अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी याबाबतची कल्पना शेजाऱ्यांना दिली; मात्र उपचाराला नेण्यापूर्वीच ते घरात कोसळले. त्यानंतर त्यांना तातडीने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. पाटील हे मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांच्या मृत्यूची बातमी कळल्यानंतर येथील कुटीर रुग्णालयात शिक्षकांनी गर्दी केली होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, आई-वडील असा परिवार आहे. सहा महिन्यांपूर्वी त्यांची पत्नी गडहिंग्लज येथे ग्रंथपाल म्हणून रुजू झाली होती. त्यामुळे ते घरात एकटेच होते. याबाबत येथील पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com