राजापूर-पत्रकार मृत्यूप्रकरणी संशयिताच्या कोठडीत वाढ

राजापूर-पत्रकार मृत्यूप्रकरणी संशयिताच्या कोठडीत वाढ

वारीशे मृत्यूप्रकरणी
संशयिताच्या कोठडीत वाढ
राजापूर, ता. १४ : पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघातील मृत्यूप्रकरणी पोलिसांच्या ताब्यात असलेला संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याच्या पोलिस कोठडीत न्यायलयाने दोन दिवसांची वाढ केली आहे. कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांची राजापूर पेट्रोल पंपातून दुचाकीमध्ये पेट्रोल भरून बाहेर पडत असताना समोरून येणाऱ्या मोटारीने दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामध्ये वारीशे गंभीर जखमी झाले होते. कोल्हापूर येथे उपचार सुरू असताना दुसर्‍या दिवशी त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी पोलीसांनी चालक पंढरीनाथ आंबेरकर याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने मंगळवारपर्यंत (ता.14) पोलिस कोठडी सुनावली होती. पोलिस कोठडीची मुदत संपल्याने त्याला पुन्हा राजापूर दिवाणी न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने पंढरीनाथ आंबेरकर याच्या पोलिस कोठडीत दोन दिवसांची वाढ केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com