भिरवंडे येथे आगीमध्ये लाकडाच्या खोपी जळाल्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भिरवंडे येथे आगीमध्ये 
लाकडाच्या खोपी जळाल्या
भिरवंडे येथे आगीमध्ये लाकडाच्या खोपी जळाल्या

भिरवंडे येथे आगीमध्ये लाकडाच्या खोपी जळाल्या

sakal_logo
By

82818
भिरवंडे ः येथील लागलेल्या आगीत झालेले नुकसान.


भिरवंडे येथे आगीमध्ये
लाकडाच्या खोपी जळाल्या
कनेडी ,ता. १४ ः भिरवंडे गावातील जांभूळभाटले परिसरात अचानक लागलेल्या आगीत दोन शेतकऱ्यांच्या लाकडाच्या खोपी जळून नुकसान झाले. आज सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली. गोपाळ श्रीधर सावंत आणि रणजीत रघुनाथ सावंत यांचे यात नुकसान झाले.
भिरवंडे जांभूळभाटलेवाडी येथे आज सकाळी अकराच्या सुमारास आग लागली. विद्युतभारीत तारांच्या घर्षणाने आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज व्यक्त होत आहे. पावसाळी हंगामासाठी साठवलेल्या लाकूड फाटा आणि त्यासाठी बांधलेल्या खोपीचे यात नुकसान झाले. वाऱ्यामुळे आगीने रौद्ररुप धारण केले; मात्र, स्थानिकांनी आग अटोक्यात आणली. परिसरातील आंबा, काजूलाही झळ बसली. दरम्यान, तलाठी समृद्धी गवस, कोतवाल अशोक सावंत, उपसरपंच नितीन सावंत आदींनी पंचनामा केला.