...अन्यथा बारावी परिक्षेवर बहिष्कार

...अन्यथा बारावी परिक्षेवर बहिष्कार

...अन्यथा बारावी परिक्षेवर बहिष्कार

आयटी शिक्षक; प्रलंबित मागण्यांबाबत संघटनेचे राज्य मंडळाला निवेदन

कणकवली, ता. १५ ः राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन माहिती तंत्रज्ञान (आयटी) शिक्षक संघटनेच्या मागण्या मान्य न झाल्यास फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा राज्य संघटनेने दिला आहे. याबाबतचे निवेदन राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षण राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिले.
निवेदनात म्हटले आहे की, बारावीसाठी माहिती तंत्रज्ञान हा विषय कला, वानिज्य आणि विज्ञान या तिन्ही शाखांसाठी शिकवला जातो. या विषयाची परिक्षा राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे यांच्यामार्फत ऑनलाईन पद्धतीने घेतली जाते. ही परीक्षा येत्या २३, २४ आणि २५ मार्चला घेतली जाणार आहे. परीक्षा पार पाडण्यासाठी माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षक हे तांत्रिक सहाय्यकांची महत्त्वाची भूमिका असते. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान शिक्षक संबंधित शाळा महाविद्यालयावर अत्यंत मोलाची भूमिका बजावत आहेत. ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेद्वारा विद्यार्थ्यांचे प्रवेश सर्व अनुदानित शाळांतील शिक्षकांचे शालार्थ प्रणालीद्वारे वेतन, त्यांचे प्रशिक्षण, विद्यार्थ्यांची सरल प्रणालीमध्ये माहिती भरणे, युडायस प्लस पोर्टलमध्ये माहिती भरणे, ऑनलाईन शिक्षण व प्रशिक्षण अशा सर्व शासनाच्या प्रक्रियेमध्ये तांत्रिक सहाय्य देण्यासाठी माहिती तंत्रज्ञान शिक्षक २१ वर्षांपासून केवळ पाच हजार एवढ्याच मानधनावर प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. या शिक्षकांचे शासनाचे वरिष्ठ वेतनश्रेणी प्रशिक्षण शासनामार्फत पूर्ण झाले आहे.
महत्त्वाच्या विषयाबाबत शासनस्तरावर वेतन अनुदान देणे उच्च माध्यमिक स्तरावरील माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांना वेतनापोटी अनुदानाची तरतूद करण्यासाठी शासनाने माहिती संकलन प्रक्रिया पूर्ण केली आहे. ही फाईल २१ वर्षांपासून शासन निर्णयासाठी प्रलंबित आहे. शिक्षकांना वेतन अनुदान मिळावे. त्यांची २००१-०२ पासूनची सेवा ग्राह्य धरावी आदी मागण्या पूर्ण कराव्यात. याबाबत निर्णय घेतला जात नसल्याने माहिती तंत्रज्ञान विषय शिक्षकांनी माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परिक्षेवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
--
दीड लाख विद्यार्थ्यांची असुविधा
राज्यातील अंदाजे दोन हजारांपेक्षा अधिक माहिती तंत्रज्ञान विषयाचे शिक्षक सहभागी होणार आहेत. सुमारे एक लाख ६० हजार विद्यार्थ्यांना माहिती तंत्रज्ञान विषयाच्या ऑनलाईन परीक्षा देताना असुविधेचा सामना करावा लागेल, अशी माहिती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष अतुल पाटील, सचिव विशाल शिंदे व उपाध्यक्ष नितीन राऊळवार, नंदकुमार जाधव, संजय पवार, प्रशांत भावसार आदी पदाधिकाऱ्यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com