जांभवडे येथे 
क्रिकेट स्पर्धा

जांभवडे येथे क्रिकेट स्पर्धा

जांभवडे येथे
क्रिकेट स्पर्धा
कनेडी ः जांभवडे (ता.कुडाळ) भगवती क्रिकेट संघ व मित्र मंडळातर्फे सरपंच चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित केली आहे. ही स्पर्धा १७ ते १९ फेब्रुवारी रोजी भगवती मंदिर जांभवडे लगतच्या मैदानावर होणार आहे. स्पर्धेत एक गाव एक संघ सहभागी होणार आहे. विजेत्या संघाला ११ हजार १११ रुपये, उपविजेते ७ हजार ७७७ रूपये आणि प्रत्येकी सरपंच चषक तसेच उत्कृष्ट गोलंदाज, क्षेत्ररक्षक, फलंदाज, मालिकावीर यांनाही पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
------
आशिये येथे
क्रिकेट स्पर्धा
कणकवली ः ‘बाळासाहेबांची शिवसेना’ पुरस्कृत बाळा पावस्कर स्मृती चषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. आशिये २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत अशिय येथील मैदानावर ही स्पर्धा होईल. स्पर्धेतील विजेत्याला ५० हजार एक रुपया, उपविजेता २५ हजार एक रुपया व चषक देण्यात येणार आहे. स्पर्धेत १६ संघ सहभागी होतील. भाई पावस्कर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com