विद्यार्थ्यांच्या यशातच शाळेचा लौकिक

विद्यार्थ्यांच्या यशातच शाळेचा लौकिक

82924
आरोस-दांडेली ः अपूर्वा नाईक हिचा गौरव करताना तहसीलदार अरुण उंडे. सोबत बाळा परब, नीलेश देऊलकर, हेमंत कामत आदी. (छायाचित्र ः नीलेश मोरजकर)

विद्यार्थ्यांच्या यशातच शाळेचा लौकिक

तहसीलदार अरुण उंडे; आरोसमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा

सकाळ वृत्तसेवा
बांदा, ता. १५ ः अभ्यासासह क्रीडा स्पर्धांची आवड असणे महत्त्वाचे आहे. प्रत्येक विद्यार्थ्याने करियर म्हणून स्पर्धेत उतरावे. शाळेचा लौकिक इमारत बांधण्यात नव्हे, तर विद्यार्थ्यांच्या यशातच दिसून येते. कोकणातील समस्या सुटण्यासाठी येथील विद्यार्थी अधिकारी बनणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन सावंतवाडीचे तहसीलदार अरुण उंडे यांनी केले.
विद्याविहार इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आरोसच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभावेळी तहसीलदार उंडे बोलत होते. व्यासपीठावर करियर गाईडन्स समुपदेशक प्रा. रुपेश पाटील, निवृत्त प्राचार्य अल्ताफ खान, प्रा. प्रभाकर नाईक, आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बाळा परब, माजी अध्यक्ष भाऊ कामत, उपाध्यक्ष सावळ, सचिव शांताराम गावडे, खजिनदार बाळा मोरजकर, आरोस पोलिस पाटील महेश आरोसकर, उपसरपंच सरिता नाईक, शालेय समिती अध्यक्ष हेमंत कामत, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गजानन परब, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, आरोस ग्रामपंचायत सदस्या मनीषा परब, पालक-शिक्षक संघ उपाध्यक्ष संतोष पिंगुळकर, मुख्याध्यापक सदाशिव धुपकर आदी उपस्थित होते.
दरम्यान, दहावीमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थिनी रिया घोगळे हिचा सत्कार करण्यात आला. आदर्श विद्यार्थिनी अपूर्वा नाईक, आदर्श शिक्षक विवेकानंद सावंत, आदर्श पालक संतोष पिंगुळकर, कोल्हापूर विभागीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झालेली मयुरी आरोसकर, राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत राज्यात द्वितीय आलेल्या प्रा. सुषमा मांजरेकर आणि सहायक शिक्षिका अनुष्का गावडे यांनाही गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक नीलेश देऊलकर यांनी केले. सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. मांजरेकर यांनी वार्षिक अहवाल वाचन केले. हस्तलिखिताचे प्रकाशन तहसीलदार उंडे यांच्या हस्ते करण्यात आले. गुणगौरव कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पालेकर यांनी केले. आभार मुख्याध्यापक धुपकर यांनी मानले.
---
अहोरात्र मेहनत घ्या
प्रा. पाटील यांनी आपल्या घरच्या परिस्थितीचे भांडवल करण्यापेक्षा परिस्थितीवर मात करण्याचे आवाहन केले. परिस्थितीवर मात करणारे इतिहास बदलतात आणि भांडवल करणारे तोच इतिहास वाचून गप्प असतात. स्पर्धा परीक्षांची कास धरा. आई-वडिलांच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अहोरात्र मेहनत घ्या, असे त्यांनी मार्गदर्शन केले. अल्ताफ खान, प्रभाकर नाईक, हेमंत कामत आदींनी विचार व्यक्त केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com