
संगमेश्वरमधील गाळ उपशाला उद्यापासून सुरवात
rat१५७.txt
बातमी क्र.. (टुडे पान १ साठी)
(टीप- आज टुडे पान २ वर मेन बातमी लागली आहे. त्याचा फोटो वापरता येईल.)
सकाळ बातमीचा परिणाम--लोगो
संगमेश्वरमधील गाळ उपशाला आजपासून सुरवात
उपसरंपच शेरे ; पालकमंत्र्यांनी केली ५० लाखांची तरतूद
सकाळ वृत्तसेवा
संगमेश्वर, ता. १५ ः येथील शास्त्री आणि सोनवी नदीतील गाळ उपशाला गुरुवारपासून (ता. १६) प्रारंभ होणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी या कामासाठी ५० लाखांची तरतूद केल्याची माहिती नावडीचे उपसरपंच विवेक शेरे यांनी दिली.
बुधवारी (ता. १५) दैनिक ''सकाळ''मध्ये संगमेश्वरमधील गाळ उपशाला मुहूर्त केव्हा? यंदाही बाजारपेठेला पुराचा धोका अशा मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. याची तातडीने दखल घेऊन हे काम सुरू होणार आहे. ९ वर्षापूर्वी काँग्रेसचे स्थानिक नेते अशोक जाधव यांच्या प्रयत्नाने शास्त्री आणि सोनवी नदीतील गाळ उपसा करण्यात आला होता. पैसाफंड हायस्कूल ते पावटा मैदान असा शास्त्री नदीतील तर मारूती मंदिर ते पावटा मैदान असा सोनवी नदीतील गाळ तेव्हा बाहेर काढण्यात आला होता. या नद्यांतील गाळ उपसा करून तो रामपेठ येथील रस्त्याच्या बाजूला टाकण्यात आला होता तसेच त्याचे सपाटीकरण करण्यात आले होते; मात्र पुढील उपसा थांबल्याने हाच गाळ पुन्हा नदीपात्रात जात आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.
गतवर्षीच्या पावसाळ्यात संगमेश्वर बाजारपेठेला तीनवेळा पुराने धक्का दिला होता. जवळपास ४ दिवस बाजारपेठेत पाणी होते. यानंतर तरी गाळ उपसा होईल अशी अपेक्षा होती; मात्र यावर्षीही ती पूर्ण झालेली नाही. याबाबत विवेक शेरे म्हणाले, गाळ उपशासाठी पालकमंत्री सामंत यांनी नदीकाठच्या ग्रामपंचायतींकडून प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार नावडी ग्रामपंचायतीने हा प्रस्ताव दिला होता. यासाठी तातडीने ५० लाखांची तरतूद करण्यात आली असून उद्यापासून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. पैसाफंड ते पावटा मैदान हा शास्त्रीनदीतील टप्पा तर मारूती मंदिर ते पावटा मैदान हा सोनवी नदीतील टप्पा यातून गाळमुक्त होणार आहे. त्यामुळे बाजारपेठेची पुरापासून मुक्तता होणार आहे.
--