
सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागांत ७.८८ टक्के दूषित पाणी
सिंधुदुर्गच्या ग्रामीण भागांत
७.८८ टक्के दूषित पाणी
आरोग्य विभागाचा अहवाल
सकाळ वृत्तसेवा
सिंधुदुर्गनगरी, ता. १५ ः जिल्ह्यातील ग्रामीण भागात दूषित पाण्याचे प्रमाण ७.८८ टक्के एवढे आहे. तपासण्यात आलेल्या एकूण ११०४ पाणी नमुन्यांपैकी ८७ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. जिल्ह्यात दूषित पाण्याचा प्रश्न कायम असल्याची माहिती आरोग्य विभागाच्या अहवालावरून समोर आली आहे.
जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एकूण ११०४ सार्वजनिक स्त्रोतांचे पाणी नमुने तपासण्यात आले. त्यापैकी ८७ पाणी नमुने दूषित आढळून आले आहेत. ग्रामीण भागात सरासरी ७.८८ टक्के एवढे दूषित पाण्याचे प्रमाण असून सर्वाधिक देवगड तालुक्यात १९.५१ टक्के पाणी नमुने दूषित आढळून आले असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. तपासण्यात आलेल्या एकुण ११०४ पाणी नमुन्यांपैकी ८७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. ग्रामीण भागातील दूषित पाण्याचे प्रमाण पाहता सरासरी ७.८८ टक्के एवढे आहे. जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या अहवालानुसार सावंतवाडी तालुक्यात २३९ पैकी १८ नमुने दूषित (७.५३ टक्के), वेंगुर्ले ११६ पैकी २२ (१८.९७), कुडाळ १६८ पैकी १० (५.९५), मालवण ३३३ पैकी ४ (१.२०), कणकवली ८८ पैकी १६ (१८.१८) टक्के, देवगड ८२ पैकी १६ (१९.५१), दोडामार्ग ५४ पैकी १ (१.८५) टक्के, दोडामार्ग ११४ पैकी १५ (१३.१६).
--
कोट
तपासलेल्या एकूण ११०४ पाणी नमुन्यांपैकी ८७ पाणी नमुने दूषित आढळले आहेत. वैभववाडीत मात्र २४ पैकी एकही पाणी नमूना दूषित आढळलेला नाही. तरीही खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
- डॉ. महेश खलिपे, आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद