यशासाठी गुरुजनांचा आदर्श घ्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यशासाठी गुरुजनांचा आदर्श घ्या
यशासाठी गुरुजनांचा आदर्श घ्या

यशासाठी गुरुजनांचा आदर्श घ्या

sakal_logo
By

82973
नेमळे ः डॉ. रामचंद्र गणपत्ये यांना पुरस्कार प्रदान करताना मंत्री श्रीपाद नाईक. शेजारी आ. भि. राऊळ आदी.

यशासाठी गुरुजनांचा आदर्श घ्या

केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक; नेमळे विद्यालयात पुरस्कार प्रदान सोहळा

सावंतवाडी, ता. १५ ः नेमळे विद्यालयाने हजारो विद्यार्थी घडविले आहेत. शिक्षणासह सुसंस्कार, खेळ, विविध स्पर्धेत विद्यार्थ्यांनी यश मिळविले आहे. मुलांनी गुरुजनांसाठी, आई-वडिलांसाठी काहीतरी करण्यासाठीचे ध्येय बाळगावे. समाजसेवेचे व्रत जोपासल्याने डॉ. गणपत्ये यांना पुरस्काराने गौरविण्यात आले. अशा गुरुजनांचा आदर्श घेऊन वाटचाल केल्यास यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यटन आणि बंदरे, जहाजबांधणी आणि जलमार्ग राज्यमंत्री खासदार श्रीपाद नाईक यांनी केले.
नेमळे पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक आणि पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.यावेळी पुरस्कारांचे वितरण झाले. दरम्यान, जिल्ह्यात गोळाफेकमध्ये प्रथम सोहम मडवळ व थाळीफेकमध्ये प्रथम क्रमांक प्राप्त पांडुरंग पाटकर यांच्यासह दहावी, बारावीतील यश प्राप्त विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. दहावीतील आदर्श विद्यार्थी विष्णू करमळकर, सुहानी परब व बारावीतील आदर्श विद्यार्थी विष्णू गावडे, संध्या राऊळ या सर्वांचे अभिनंदन केले. सत्कारमूर्ती सावंत, गणपत्ये, फडके यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी उपाध्यक्ष हेमंत भगत, सचिव स. पा. आळवे, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष महादेव राऊळ, राजन मडवळ, आनंद नेमळेकर, मदन राऊळ, तुकाराम गुडेकर, श्रीकृष्ण म्हाडेश्वर इत्यादी उपस्थित होते. प्रास्ताविक व परिचय प्रा. बोवलेकर यांनी केले. अहवाल वाचन राजेश गुडेकर यांनी, मानपत्रांचे वाचन नितीन धामापूरकर यांनी केले. अनिल कांबळे यांनी सूत्रसंचालन केले. लवू जाधव यांनी आभार मानले.
--
पुरस्कारांचे वितरण
कार्यक्रमाचे अध्यक्ष आ. भि. राऊळ यांच्या उपस्थितीत (कै.) तात्यासाहेब पोकळे आदर्श समाज कार्यकर्ता पुरस्कार डॉ. रामचंद्र गणपत्ये यांना दिला. मानपत्र, शाल, श्रीफळ व रोख रक्कम, असे पुरस्काराचे स्वरुप होते. या कार्यक्रमात गुरुवर्य ज. भा. पेंढारकर स्मृती पुरस्कार माडखोल-धुरीवाडी नं. ६ चे दत्ताराम सावंत यांना संस्थाध्यक्ष राऊळ यांच्या हस्ते, तर (कै.) प्रमिला जाधव आदर्श शिक्षिका पुरस्कार श्रीराम माध्यमिक विद्यालय पडेल (ता. देवगड) शाळेच्या संजीवनी फडके यांना प्रा. कल्पना बोवलेकर यांच्या हस्ते प्रदान केला.