नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात जोरदार वाहनखरेदी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात जोरदार वाहनखरेदी
नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात जोरदार वाहनखरेदी

नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात जोरदार वाहनखरेदी

sakal_logo
By

rat१५१५.txt
( पान २ साठी मेन)

जानेवारीत वाहन खरेदीचा वाढता कल

नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात जोरदार वाहनखरेदी

दुचाकी हजारांहून अधिक ; चारचाकी १ हजार ९८९ वाहने रस्त्यावर

सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १५ ः प्रत्येकाचीच गरज झाल्यामुळे वाहनखरेदी वाढू लागली आहे. जानेवारी महिन्यात नववर्षाच्या सुरवातीलाच १ हजार ३१८ दुचाकींची खरेदी झाली आहे. त्याचबरोबर या महिन्यात चारचाकी वाहनांच्या खरेदीलाही चांगला प्रतिसाद मिळाला असून, एकाच महिन्यात १ हजार ९८९ चारचाकी वाहने रस्त्यावर धावू लागल्या आहेत. या वाहनांची नोंदणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे झाली आहे.
वाहनामुळे समाजात प्रतिष्ठाही मिळत असल्याने गेल्या काही वर्षांमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाहन खरेदी होताना दिसते. काहीजण साडेतीन मुहुर्तातील एक मुहूर्त शोधतात तर काहीजण नवीन वर्षातील पहिल्याच महिन्यातील महत्वाच्या तारखांना वाहन खरेदी करतात. त्यानुसार येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात जानेवारी २०२३ मध्ये मोठ्या प्रमाणात वाहन खरेदीची नोंदणी झाली आहे. यामध्ये सर्वात जास्त स्कूटर्सची खरेदी झाली आहे. महिन्यात ७९० स्कूटर्स रस्त्यावर आल्या आहेत.
मोटार सायकल ५२७ तर मोपेड १ वाहन खरेदी केल्याची नोंदणी झाली आहे तर १ हजार ९८९ चारचाकी वाहने खरेदी केल्याची नोंद झाली आहे. यामध्ये मोटारकार ३१२, रिक्षा १५७, ट्रक २७, डिलिव्हरी वाहने ९२, तीनचाकी डिलिव्हरी वाहने ३१, जेसीबी १० आदींची वाहनांची खरेदी झाली आहे. जानेवारी महिन्यात एकूण ३ हजार ३०७ वाहनांची खरेदी झाल्याची नोंद आरटीओ कार्यालयात झाली आहे. पेट्रोलला पर्याय म्हणून इलेक्ट्रिक वाहने खरेदीमध्ये वाढ झाली आहे. या वाहनांच्या किमती कमी होणार असल्याचे सरकारने जाहीर केल्याने आता इलेक्ट्रिक वाहनांचीही मागणी वाढत आहे.
--

पेट्रोल वाहनांसाठी ६ महिन्यांचे वेटिंग

अजूनही पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांना अधिक पसंती आहे. विविध कंपन्यांची नवीन मॉडेल्स आकर्षित करत असल्याने सहा महिन्यांचे वेटिंग करावे लागते. मालवाहू वाहनांचाही बाजार वाढला.मालवाहतूक करणाऱ्या चारचाकी आणि तीन चाकीलाही मागणी वाढली असून, या महिन्यात चारचाकी ९२ आणि तीनचाकी ३१ अशा एकूण १२३ मालवाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी जानेवारी महिन्यात झाली.
--
कोट...

प्रत्येकालाच आता वाहन गरजेचे झाले आहे. काहींना नववर्षाच्या पहिल्या दिवशी वाहन खरेदी करायचे असते तर काहींना नव्या वर्षाच्या पहिल्या महिन्यात विशिष्ट तारखेला वाहन खरेदी करावयाची असते. त्यामुळे यंदा जानेवारी महिन्यात अधिक वाहनांची नोंदणी येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात झाली आहे.

- अजित ताम्हणकर, सहाय्यक उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, रत्नागिरी