कोरोनामुळे पती गमावलेल्‍या 
विधवांना कणकवलीत मदत

कोरोनामुळे पती गमावलेल्‍या विधवांना कणकवलीत मदत

83000
कणकवली : कोरोना कालावधीत पतीचे निधन झालेल्‍या शहरातील महिलांना नगरपंचायतीकडून आज अर्थसहाय्य करण्यात आले.


कोरोनामुळे पती गमावलेल्‍या
विधवांना कणकवलीत मदत

नगरपंचायतीतर्फे प्रत्येकी पंचवीस हजार

कणकवली, ता.१५ : कोविडमुळे पतीचे निधन झालेल्या शहरातील विधवांना नगरपंचायतीकडून प्रत्‍येकी २५ हजारांचे अर्थसहाय्य देण्यात आले. आज या महिलांना या रक्‍कमेचे धनादेश नगरपंचायत कार्यालयात देण्यात आले.
कोविडमुळे पती गमावलेल्‍या महिलांना प्रत्‍येकी पंचवीस हजार रूपये अर्थसहाय्य करण्याचा निर्णय नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी नगरपंचायत सभेत घेतला होता. या निणर्याची आज अंमलबजावणी करण्यात आली. या विधवांना उद्योग, व्यवसाय करता यावा यासाठी ही छोटीशी मदत नगरपंचायतीच्या फंडातून केल्याची माहिती नगराध्यक्ष श्री.नलावडे यांनी दिली. शहरात कोविडमुळे पती गमावलेल्‍या २० महिला आहेत. यात कागदपत्रांची पूर्तता झालेल्‍या १५ महिलांना आज धनादेश देण्यात आले. उर्वरीत पाच महिलांची कागदपत्रे जमा करण्यासाठी कार्यवाही केली जात आहे, अशीही माहिती श्री.नलावडे यांनी दिली. यावेळी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक विराज भोसले, रवींद्र गायकवाड, मेघा गांगण, माजी उपनगराध्यक्ष किशोर राणे, महेश सावंत, लेखापाल प्रियांका सोंसुरकर, रुजुता ताम्हनेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com