चिपळूण 6 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

चिपळूण 6 माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश

rat१५p१८.JPG
L83026
चिपळूणः शहरातील माजी नगरसेवकांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा निवासस्थानी स्वागत केले.
-------------
चिपळूणचे सहा माजी नगरसेवक शिंदे गटात
मुंबई मुख्यमंत्र्यांच्या निवास्थानी प्रवेश; १७ जणांच्या प्रवेशाची होती चर्चा
चिपळूण, ता. १५ः शहरातील ६ माजी नगरसेवकांनी बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेससह उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी नगरसेवकांचे स्वागत केले. मुंबईतील मुख्यमंत्र्याच्या शासकीय निवासस्थानी मंगळवारी (ता. १४) रात्री हा पक्षप्रवेश झाला. यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. १७ नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती, मात्र सध्या ६ नगरसेवकांनी प्रवेश केला. यामुळे आणखी काही नगरसेवक लवकरच प्रवेश करण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे माजी नगरसेवक सुधीर शिंदे, करामत मिठागरी, संजीवनी शिगवण, स्वीकृत नगरसेवक हारून घारे, शिवसेनेच्या माजी नगरसेविका स्वाती दांडेकर, संजीवनी घेवडेकर यांनी शिंदे गटात प्रवेश केला. दापोलीचे आमदार योगेश कदम व त्यांचे समर्थक नासीर खोत यांच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी हा पक्षप्रवेश झाला.
काही दिवसांपूर्वी काँग्रेस आणि शिवसेनेच्या या माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे यांची मुंबईत भेट घेतली होती. त्या वेळी आपण ही भेट चिपळूण शहराच्या विकासासाठी घेतली, असे जाहीर केले होते. तेव्हापासून हे माजी नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करणार अशी चर्चा होती. अखेर मंगळवारी हा पक्षप्रवेश झाला. त्यामुळे काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी माजी नगरसेवकांचे स्वागत करताना चिपळूणच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले. वाशिष्ठी नदीतील गाळ काढणे, निळी व लाल रेषा रद्द करणे, शहरविकास आराखडा हे प्रश्न सोडवण्याबरोबर शहराच्या विकासासाठी भरघोस निधी देण्याचे आश्वासन दिले. आमदार योगेश कदम, उद्योजक नासीर खोत यांचे कोकणात उभरते नेतृत्व आहे. चिपळूणचे महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी समिती गठित करण्याचे आश्वासनही मुख्यमंत्री शिंदे यांनी दिले. चिपळूण शहरात बाळासाहेबांची शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी आम्ही रात्रंदिवस प्रयत्न करू, असे आश्वासन माजी उपनगराध्यक्ष सुधीर शिंदे यांनी दिले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com