
बौद्ध, कुणबी समाजाचीही बिरसा फायटर्सला साथ
बौद्ध, कुणबी समाजाचीही बिरसा फायटर्सला साथ
सुशिलकुमार पावरा ; महाळुंगेतील समस्या घेतल्या जाणून
दाभोळ, ता. १५ः आदिवासी समाजासोबतच आता दापोली तालुक्यात व रत्नागिरी जिल्ह्यातील काही तालुक्यांत बौद्ध व कुणबी समाजाचे लोकही बिरसा फायटर्सचे पावरा यांची मदत घेऊ लागले आहेत. त्यांनी महाळुंगे या गावातील वस्तीत जाऊन बौद्ध व कुणबी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या. जामगे गावातील आदिवासी, कातकरी व कुणबी बांधवांचा स्मशानभूमीचा प्रश्न शासनदरबारी सुटावा म्हणून निवेदन देत आंदोलनाची तयारी सुरू केली आहे. समस्या सोडवण्यासाठी शक्य ती मदत करत आहेत. त्यामुळे त्यांना आदिवासी समाजासोबतच बौद्ध व कुणबी समाजाचीही साथ व पाठिंबा मिळू लागला आहे.
समाजसेवा करणे हे सोपे काम नाही. त्यासाठी स्वत:चा पैसा व वेळ खर्च करावा लागतो. समाजसेवा ही कोणतीही अपेक्षा न बाळगता फुकटात करावी लागते. समाजकार्य करताना यातना व कष्ट सहन करण्याची क्षमता असावी लागते. अपमान व निंदा पचवण्याचे सामर्थ्य असावे लागते. कोणत्याही समाजसेवकाचे काम हे समाजकार्य मोठे झाल्यावर दिसते. अहोरात्र लोकांना भेटणे, लोकांची मानसिकता समजून घेणे, लोकांच्या समस्या समजून घेणे, समस्या सोडवणे हे समाजसेवकाला सातत्याने करावे लागते, असे प्रतिपादन सुशिलकुमार पावरा यांनी भेटीदरम्यान व्यक्त केले आहे.