चिपळूण ः काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा राजीनामा

चिपळूण ः काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांचा राजीनामा

पान १ साठी

83028

काँग्रेसचे चिपळूण तालुकाध्यक्ष
प्रशांत यादव यांचा राजीनामा
---
शिंदे गटाच्या वाटेवर; पक्षात घडामोडी अन बैठका
चिपळूण, ता. १५ ः काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या अंतर्गत घडामोडींची नैतिक जबाबदारी स्वीकारून यादव यांनी प्रदेशाध्यक्षांकडे राजीनामा पाठवला. मात्र, ते शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. यादव संचालक असलेल्या वाशिष्टी डेअरीचे उद्‍घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नुकतेच ऑनलाइन झाले, तेव्हापासून यादव शिंदे गटाच्या जवळ गेल्याची चर्चा आहे.
काँग्रेसचे तत्कालीन तालुकाध्यक्ष संदीप सावंत यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यावर तालुकाध्यक्षपद दीर्घकाळ रिक्त होते. प्रभारी तालुकाध्यक्ष म्हणून राजेश वाजे यांची नेमणूक केली होती. काही वर्षांपूर्वी भाजपमध्ये गेलेले माजी आमदार रमेश कदम काँग्रेसमध्ये आले. त्यांना पक्षाचे जिल्हाध्यक्षपद दिले. कदम यांनी प्रशांत यादव यांची तालुकाप्रमुख म्हणून नियुक्ती केली. शहर आणि तालुक्यातील कार्यकर्त्यांना एकत्र घेऊन काम करणारा तालुकाध्यक्ष म्हणून यादव यांनी ओळख निर्माण केली होती. पक्षश्रेष्ठींमध्येही त्यांची चांगली प्रतिमा तयार झाली होती. तालुक्यात काँग्रेसचे प्राबल्य कमी असले, तरी कार्यकर्त्यांमध्ये नेहमी वाद होऊन ते चव्हाट्यावर यायचे. यादव यांनी नेहमी समजूतदारपणाची भूमिका घेत कार्यकर्त्यांमध्ये समन्वय साधण्याचा प्रयत्न केला. विधानसभा निवडणुकीत दोन्ही काँग्रेसची आघाडी झाली नाही, तर यादव हे काँग्रेसकडून विधानसभेची निवडणूक लढवणार, अशी चर्चा सुरू होती.
यादव यांनी पिंपळी येथे वाशिष्टी डेअरी उभारली आहे. या डेअरीचे उद्‍घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते व्हावे, अशी त्यांची इच्छा होती. त्यामुळे ते मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी अनेकदा त्यांच्या बंगल्यावर गेले. त्या वेळी त्यांना मुख्यमंत्र्यांकडून आपल्या गटात येण्याची ऑफर दिल्याची चर्चा सुरू आहे. चिपळूण शहरातील काँग्रेसच्या माजी नगरसेवकांनी नुकताच मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्यांच्या गटात प्रवेश केला. त्यानंतर नैतिकता स्वीकारून यादव यांनी तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे.


यादव यांच्याबरोबर कोण-कोण?
काँग्रेसच्या तालुकाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यावर प्रशांत यादव हे संपर्काबाहेर आहेत. आज दिवसभर त्यांचा मोबाईलही बंद होता; परंतु काँग्रेसमध्ये प्रचंड घडामोडी सुरू झाल्या आहेत. कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू आहेत. यादव यांच्याबरोबर कोण-कोण जाणार, याची चाचपणी घेतली जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com