जलतरणपटू पूर्वा गावडेचा
जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

जलतरणपटू पूर्वा गावडेचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार

83074
सिंधुदुर्गनगरी ः जलतरणपटू पूर्वा हिचा सत्कार करताना जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी. सोबत वडील संदीप आणि आई रश्मी.

जलतरणपटू पूर्वा गावडेचा
जिल्हाधिकाऱ्यांकडून सत्कार
ओरोस, ता. १५ ः राज्य व राष्ट्रीय स्तरावर जलतरण क्रीडा प्रकारात यश मिळविलेली सिंधुदुर्गकन्या पूर्वा गावडे हिचे जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी प्रशानातर्फे सत्कार केला. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळून जिल्ह्याचे व देशाचे नाव रोशन करावे, अशा शुभेच्छाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
पुणे-बालेवाडी येथील क्रीडा संकुलमध्ये राष्ट्रीय प्रशिक्षण घेत असलेली सिंधुदुर्गनगरी येथील पूर्वा हिने जानेवारीमध्ये पुणे येथे झालेल्या महाराष्ट्र ऑलम्पिक जलतरण क्रीडा स्पर्धेत दोन सुवर्ण व दोन कांस्य, अहमदाबाद येथे झालेल्या खेलो इंडिया वुमन सिरीजमध्ये दोन रौप्य, ओरिसा-भुवनेश्वर येथे झालेल्या राष्ट्रीय वॉटर पोलो स्पर्धेतही रौप्य पदक तर नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय शालेय जलतरण स्पर्धेतही रौप्य पदक पटकावत राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली होती. जलतरण क्रीडा स्पर्धेतील या यशाबद्दल तीचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी पूर्वाला जिल्हाधिकारी कार्यालयात आमंत्रित करून जिल्हा प्रशासनाच्या वतीने तिचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, आई सौ. रश्मी, वडील संदीप आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com