
टेनिस बॉल क्रिकेटचे मालवणात उद्घाटन
83070
मालवण ः बोर्डिंग मैदानावर आयोजित क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनानंतर सामन्यात माजी खासदार नीलेश राणे यांनी फटकेबाजी केली.
टेनिस बॉल क्रिकेटचे मालवणात उद्घाटन
‘व्हरेनियम’चा पुढाकार; नीलेश राणेंची उपस्थिती
मालवण, ता. १५ : व्हरेनियम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन माजी खासदार नीलेश राणे यांच्या हस्ते आज करण्यात आले. यावेळी राणे यांनी स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
येथील टोपीवाला हायस्कूलच्या बोर्डिंग ग्राउंडवर आजपासून १९ फेब्रुवारीपर्यंत या स्पर्धा होत आहेत. आज या स्पर्धेचे माजी खासदार राणे यांच्या हस्ते आणि ‘व्हरेनियम’च्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी विशाल सेवा फाउंडेशनचे सर्वेसर्वा तथा उद्योजक विशाल परब, व्हरेनियम क्लाऊडचे चीफ ऍड नेटवर्क हेड मुंबई मुकुंदन राघवन, व्हरेनियम हेड अँड आयटी मॅनेजर विनायक जाधव, बँक ऑफ बरोडाचे कुणालकुमार, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष अशोक सावंत, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, दीपक पाटकर, मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव नंदकिशोर महाजन, आबा हडकर, राजू बिड्ये, भाई मांजरेकर, विकास गावकर, वैशाली गावकर, ओंकार गावकर आदी उपस्थित होते. यावेळी राणे यांनी काही चेंडू खेळत चांगली फटकेबाजी केली. विशाल परब यांनीही स्पर्धेला शुभेच्छा दिल्या.
उदघाटन सोहळ्यानंतर सातेरी कर्ली विरुद्ध एस. एस. वॉरियर्स या संघांमध्ये सामना झाला. हा सामना सातेरी कर्ली संघाने जिंकला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्येष्ठ समालोचक बादल चौधरी यांनी केले. या स्पर्धेसाठी बादल चौधरी, श्याम वाक्कर, उमेश परब, अमोल जमदाडे, समीर चव्हाण यांनी समालोचन केले. आम्रोज आल्मेडा, सुशील शेडगे, उमेश मांजरेकर, मंगेश धुरी, दीपक धुरी यांनी पंच म्हणून काम पाहिले. स्पर्धा प्रमुख म्हणून बंटी केरकर काम पाहत आहेत. स्पर्धेतील विजेत्यासाठी २ लाख ५१ हजार रुपये, उपविजेत्यासाठी २ लाख २५ हजार रुपये, तिसऱ्या क्रमांकासाठी २५ हजार रुपये, चौथ्या क्रमांकासाठी २१ हजार रुपये आणि भव्य असे चषक दिले जाणार आहेत.