मालवणात २६ ला चित्रकला स्पर्धा

मालवणात २६ ला चित्रकला स्पर्धा

मालवणात २६ ला चित्रकला स्पर्धा
मालवण : येथील भंडारी हायस्कूलतर्फे आयोजित आणि भंडारी हायस्कूलच्या दहावी १९७१-७२ बॅचतर्फे पुरस्कृत मालवण तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धा २६ फेब्रुवारीला सकाळी ९.३० ते दुपारी १२ या वेळेत भंडारी हायस्कूल येथे होणार आहे. ही स्पर्धा पहिले ते चौथी, पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी अशा तीन गटांत होणार आहे. प्रत्येक गटात प्रत्येक प्रशालेतील फक्त पाच विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल. प्रत्येक गटासाठी १५००, १०००, ५०० रुपये व उत्तेजनार्थ २५० रुपयांची दोन बक्षिसे देण्यात येणार आहेत. प्रवेशाची अंतिम तारीख २० फेब्रुवारी असून विद्यार्थ्यांनी भंडारी हायस्कूलमध्ये नावे नोंदवावीत, असे आवाहन करण्यात आले आहे.
--
मालवणात उद्या स्वच्छता मोहीम
मालवण : शिवजयंती उत्सवाचे औचित्य साधून भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार नीलेश राणे यांच्या संकल्पनेतून मालवण शहर भाजपा युवा मोर्चा व शिवप्रेमींच्या माध्यमातून शुक्रवारी (ता. १७) मालवण मोरयाचा धोंडा ते राजकोट या किनारपट्टी भागात स्वच्छता मोहिमेचे आयोजन केले आहे, अशी माहिती युवा मोर्चा मालवण शहर उपाध्यक्ष सौरभ ताम्हणकर यांनी दिली. शुक्रवारी सकाळी ७ वाजता या मोहिमेचा शुभारंभ होणार आहे. या स्वच्छता मोहिमेत शिवप्रेमी तसेच सामाजिक संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com