
एडगाव उपसरपंचपदी सायली घाडी बिनविरोध
83075
एडगाव ः वायबोंशी उपसरपंचपदी बिनविरोध निवड झालेल्या सायली घाडी यांचे प्रमोद रावराणे यांनी अभिनंदन केले.
एडगाव उपसरपंचपदी
सायली घाडी बिनविरोध
वैभववाडी ः एडगाव-वायबोंशी ग्रामपंचायत उपसरपंचपदी सायली सुनील घाडी यांची बिनविरोध निवड झाली आहे. उपसरपंच दत्ताराम पाष्टे यांनी राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त होते. एडगावचे उपसरपंच पाष्टे यांनी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा दिला होता. त्यामुळे हे पद रिक्त होते. उपसरपंचपदाची निवडणुक ग्रामसेवक उमेश राठोड यांच्या उपस्थितीत झाली. उपसरपंचपदासाठी सायली घाडी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. निवडीनंतर त्यांचे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे यांनी अभिनंदन केले. यावेळी सरपंच रविना तांबे, सोसायटीचे चेअरमन सुनील रावराणे, भाजयुमोचे जिल्हा उपाध्यक्ष राजु पवार, विनोद रावराणे, रवींद्र रावराणे, दत्ताराम पाष्टे, प्रज्ञा रावराणे, वैष्णवी रावराणे, चेतना पवार, रविंद्र तांबे, गोविंद घाडी, सुनील घाडी, बयाजी गुरखे, सखाराम फाळके, योगेश पवार आदी उपस्थित होते.
----------
किनारी भागात उष्णतेत वाढ
देवगड ः तालुक्याच्या किनारी भागात उष्णतेची चाहूल लागली आहे. वातावरणातील उकाडा वाढला असून दुपारच्यावेळी कडक उनाच्या झळा बसत होत्या. तर सकाळच्यावेळी थंडी जाणवत होती. दुपारच्यावेळी वातावरणातील उकाडा वाढू लागला आहे. कडक ऊन असते. पहाटेच्यावेळी वातावरणात गारवा जाणवत होता. मध्यंतरी किनारी भागात जोराचा वारा सुटत होता. आता वारा कमी होऊन वातावरणातील उष्णता वाढल्याचे चित्र होते. आज दुपारी ३० डि.से.पेक्षा अधिक तापमान वाढले होते. त्यामुळे आता आगामी उकाड्याची चाहूल मानली जात आहे.