‘अंनिस’ राज्य कार्यकारिणीची मालवण येथे १८ ला बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘अंनिस’ राज्य कार्यकारिणीची
मालवण येथे १८ ला बैठक
‘अंनिस’ राज्य कार्यकारिणीची मालवण येथे १८ ला बैठक

‘अंनिस’ राज्य कार्यकारिणीची मालवण येथे १८ ला बैठक

sakal_logo
By

‘अंनिस’ राज्य कार्यकारिणीची
मालवण येथे शनिवारी बैठक
मालवण, ता. १५ ः महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक बॅ. नाथ पै सेवांगण, मालवण येथे १८ आणि १९ फेब्रवारीला होणार आहे. या बैठकीसाठी राज्यभरातील २३ जिल्ह्यांतून अंनिसचे २०० कार्यकर्ते उपस्थित राहतील, अशी माहिती बॅ. नाथ पै सेवांगणचे अध्यक्ष अ‍ॅड. देवदत्त परुळेकर आणि अंनिसचे पूर्णवेळ कार्यकर्ते राहुल थोरात यांनी दिली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी सुरू केलेल्या महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारिणीची बैठक १७ वर्षांनंतर मालवण येथे होत आहे. बैठकीची सुरुवात शनिवारी (ता. १८) सकाळी १० वाजता बॅ. नाथ पै सेवांगणचे विश्वस्त सचिव लक्ष्मीकांत खोबरेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत होईल. दिवसभर या बैठकीत अंनिसच्या बारा विभागांच्या पुढील सहा महिन्यांच्या कामकाजाचे नियोजन केले जाईल. रविवारी (ता. १९) सकाळी ११ वाजता अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा ‘आधास्तंभ’, ‘शतकवीर’ या पुरस्काराने गौरव करण्यात येईल. हे पुरस्कार सुप्रसिद्ध साहित्यिक प्रा. प्रवीण बांदेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. या कार्यक्रमाचे अध्यक्ष अ‍ॅड. देवदत्त परुळेकर हे असतील. या राज्यबैठकीसाठी राज्यभरातून अंनिसचे पदाधिकारी मिलिंद देशमुख, डॉ. हमीद दाभोलकर, राजीव देशपांडे, मुक्ता दाभोलकर, नंदिनी जाधव, रामभाऊ डोंगरे, प्रशांत पोतदार, अण्णा कडलास्कर, फारुख गवंडी, प्रा. प्रवीण देशमुख, दीपक गिरमे, अरविंद पाखले, गणेश चिंचोले, प्रभाकर नानावटी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीचे संयोजन सेवांगणचे व्यवस्थापक संजय आचरेकर, अंनिसचे सुहास पवार, सुहास यरोडकर, सम्राट हटकर, प्रा. अशोक कदम, प्रकाश घादगिने करीत आहेत.