वागदे गोपरी आश्रमाचा रस्ता धोकादायक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वागदे गोपरी आश्रमाचा रस्ता धोकादायक
वागदे गोपरी आश्रमाचा रस्ता धोकादायक

वागदे गोपरी आश्रमाचा रस्ता धोकादायक

sakal_logo
By

kan162.jpg
L83109
कणकवलीः शहरातील मराठा मंडळ ते वागदे जाणाऱ्या रस्त्याची झालेली दुरावस्था

---------
वागदे गोपरी आश्रमाचा रस्ता धोकादायक
कणकवली, ता. १४ः शहरातून मराठा मंडळ येथील बंधाऱ्यावरून गोपूरी आश्रम वागदे येथे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने वाहन चालणे अवघड झाले आहे. शहरातील महामार्गावरून वागदे गावात जाण्यासाठी हा पर्याय आणि जवळचा मार्ग आहे. येथे अवजड वहाने वगळता इतर वाहनांना हा जवळचा पर्यायी मार्ग असल्याने येथे वाहनांची वर्दळ असते. मात्र, गेल्या तीन वर्षापासून या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यामुळे वाहने चालवणे कठीण झाले आहे. या रस्त्याची तात्काळ दुरूस्ती करावी अशी मागणी होत आहे.