बचगटातून व्यवसायवृध्दी तेजीत

बचगटातून व्यवसायवृध्दी तेजीत

83200
KOP20J98434-1
.....................

बचगटातून व्यवसायवृध्दी तेजीत
सिंधुदुर्गात ‘उमेद’ः कर्ज निधी वितरणाचे १४४ टक्के उद्दिष्ट गाठले
सकाळ वृत्तसेवा
ओरोस, ता. १६ः उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत २०२२-२३ या आर्थिक वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३४०० बचतगट समूहांना ६५ कोटी एवढे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्यात आतापर्यंत ९३ कोटी ६० लाख ७९ हजार रुपये एवढे कर्ज वितरण ३१२९ समूहांना केले आहे. बचतगट समूह उद्दिष्टांत ९२.०३ टक्के काम झाले आहे. कर्ज निधी वितरणात १४४.०१ टक्के एवढे काम झाले आहे. आर्थिक वर्ष संपायला अजून दीड महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना जिल्ह्याने एवढी मजल मारल्याने जिल्ह्यातील महिलांना समूहाच्या माध्यमातून व्यवसाय निर्माण करण्यास संधी मिळाली आहे.
केंद्राच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान राबविले जात आहे. ग्रामीण भागातील महिलांना बचतगट समूहाच्या माध्यमातून आर्थिक सक्षम करण्यासाठी केंद्र व राज्य शासन यांचे संयुक्त प्रयत्न आहेत. या महिलांना व्यवसाय प्रशिक्षण देवून त्या व्यवसायासाठी बँकेच्या माध्यमातून कर्ज उपलब्ध करून दिले जाते. यासाठी प्रत्येक वर्षी राज्य स्तरावरून सर्व जिल्ह्यांना स्वतंत्र उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्याला ३४०० बचतगट समूहांना ६५ कोटी रुपये एवढे कर्ज वितरण करण्याचे उद्दिष्ट दिले होते.
सिंधुदुर्ग जिल्हा नेहमीच कर्ज वितरणात आघाडीवर राहिला आहे; मात्र यावर्षी जिल्ह्याने यात मोठी आघाडी घेतली आहे. योजनेचे जिल्हा अभियान संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली सह अभियान संचालक डॉ. उदय पाटील व तत्कालीन सह अभियान संचालक राजेंद्र पराडकर यांनी नियोजनबध्द राबविलेल्या उपक्रमामुळे तसेच जिल्हा अभियान व्यवस्थापक वैभव पवार व त्यांच्या टीमने घेतलेल्या मेहनतीमुळे नोव्हेंबरमध्ये कर्ज वितरण रक्कम उद्दिष्ट पूर्ण झाले होते. समूह संख्येत ८६.४२ टक्के काम झाले होते. त्यामुळे जिल्हा सध्या राज्य स्तरावर आघाडीवर राहिला होता. जिल्ह्यातील बँकांनी अपेक्षित सहकार्य केल्याने हे उद्दिष्ट गाठणे शक्य झाले आहे. यात जिल्हा बँक, को ऑपरेटिव्ह बँका, पब्लिक सेक्टर बँका, ग्रामीण बँका, खाजगी बँका यांचा महत्वाचा वाटा आहे.

चौकट
‘उत्सव नवरात्रीचा’ अभियानाने दिली साथ
सिंधुदुर्ग जिल्हा उमेद-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अंतर्गत २६ सप्टेंबरपासून नवरात्रोत्सवानिमित्त ‘उत्सव नवरात्रीचा, उत्सव महिला सक्षमीकरणाचा’, हे विशेष अभियान राबविण्यात आले होते. या अंतर्गत ९ दिवसांत तब्बल ३७३ बचतगट समूहांना ११ कोटी ९ लाख २७ हजार रुपये एवढे कर्ज वितरण केले होते. यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांचे मोठे सहकार्य लाभले होते. या विशेष अभियानाने उद्दिष्ट झटपट पूर्ण करण्यास साथ दिली आहे.

कोट
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर यांच्या मार्गदर्शनाखाली कर्ज वितरण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात आले होते. यासाठी जिल्ह्यातील बँकांनी सहकार्याची भूमिका दर्शविली होती. त्यातील ''उत्सव नवरात्रीचा, उत्सव महिला सक्षमीकरणाचा'' या अभियानात ११ कोटींच्यावर कर्ज वितरण या नऊ दिवसात झाले. या शिवाय बँकांनी आपल्या स्तरावर कर्ज प्रस्ताव मंजूर करण्यासाठी मोहीम राबविली होती. यामुळेच नोव्हेंबरमध्ये आम्ही कर्ज रक्कम उद्दिष्ट पार करू शकलो होतो. त्यानंतर कर्ज वितरणमध्ये सातत्य राहिल्याने निधी वितरणात १४४ टक्के काम होऊ शकले आहे. उद्दिष्टांच्या केवळ ८ टक्के बचतगट समूहांना कर्ज मिळालेले नाही. उर्वरित दीड महिन्यात हे उद्दिष्ट पूर्ण होईल.
- डॉ. उदय पाटील, अभियान जिल्हा सह संचालक
-------------
कोट
"जिल्ह्यातील बचतगट समूहाचे अजूनही प्रस्ताव येत आहेत. अनेक प्रस्ताव मंजूर होऊन कर्ज वितरण झाले आहे; पण ऑनलाईन दिसत नाही. पात्र असलेल्या सर्व बचतगट समूहांना कर्ज मंजूर करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील बँका यासाठी सहकार्य करण्याच्या मनस्थितीत आहेत. त्यामुळे कर्ज वितरण रक्कमप्रमाणे समूह उद्दिष्ट १०० टक्केच्या पुढे जाईल."
- वैभव पवार, जिल्हा व्यवस्थापक
--------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com