संक्षिप्त

संक्षिप्त

rat१६१३.txt

(टुडे पान २ साठी, संक्षिप्त)

फोटो ओळी
-rat१६p१.jpg-
८३१२४
रत्नागिरी ः राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत श्रुती काळे हिने सुवर्ण तर एका रौप्यपदकाची कमाई केली.
--

राज्यस्तरीय तायक्वॉंदोमध्ये श्रुती काळेचे यश

रत्नागिरी ः वर्धा येथे झालेल्या राज्यस्तरीय तायक्वॉंदो स्पर्धेत रत्नागिरीतील जीजीपीएस शाळेच्या श्रुती काळे हिने दैदिप्यमान यश संपादन केले. या राज्यस्तरीय स्पर्धेत तिने एक सुवर्ण तर एका रौप्यपदकाची कमाई करत रत्नागिरीचे नाव उंचावले. तायक्वॉंदो फेडरेशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रा व वर्धा जिल्हा तायक्वांदो असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्य कॅडेट अजिंक्यपद तायक्वांदो स्पर्धा घेण्यात आली. ही स्पर्धा १२ ते १४ फेब्रुवारीदरम्यान वर्धा जिल्ह्यातील पुलगाव लक्ष्मी सेलिब्रेशन हॉल येथे झाली. राज्यस्तरीय स्पर्धेत रत्नागिरी जिल्हा संघात रत्नागिरी तालुक्यातील युवा मार्शल आर्ट तायक्वांदो ट्रेनिंग सेंटर नाचणे ओम साई मित्रमंडळ येथील तायक्वांदो प्रशिक्षण वर्गातील खेळाडू श्रुती काळे ही सहभागी झाली होती. तिने यापूर्वी देखील जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत आपली छाप सोडली आहे.
-
फोटो ओळी
-rat१६p६.jpg ः
८३१२९
संगमेश्वर ः नव्याने तयार झालेला रस्ता.
--
तांबेडी गावात ब्रीद यांनी स्वखर्चातून केला रस्ता

संगमेश्वर ः तालुक्यातील तांबेडी गावातील तांबेडी-मधलीवाडी- सांगलेवाडी- ईचलेवाडी हा सुमारे ५०० मीटरचा जोडरस्ता गावातील युवा उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते सिद्धेश ब्रीद यांनी स्वखर्चातून व गावकऱ्यांच्या सहकार्याने मातीकाम, खडीकरण, डांबरीकरण आदी कामे करून हा जोडरस्ता बनवून दिला आहे. यापूर्वीही गावच्या देवळात जाणारा रस्ताही त्यांनी करून दिला होता. तसाच हा रस्ता स्वखर्चाने करून देण्याचे मान्य करून या रस्त्याच्या कामाला सुरवात करून ते काम पूर्णत्वास नेले आहे. या तांबेडी गावातील स्वखर्चातून केलेल्या ५०० मिटर रस्ता काम मार्गी लागल्याने गावातील ग्रामस्थांनी ब्रीद यांना धन्यवाद दिले आहेत. यापूर्वीही गावच्या देवळात जाणारा रस्ताही त्यांनी विक्रोळीचे आमदार सुनील राऊत यांच्या सहकार्याने करून दिला होता. तसाच हा रस्ताही ब्रीद यांनी स्वखर्चातून करत गावातील तीन वाड्यांची गैरसोय दूर करत सामाजिक बांधिलकी व गावातील जनतेच्या भावना जपत या रस्त्याचे काम मार्गी लावल्याने गावकरी समाधान व्यक्त करत आहेत.
--
चिपळुणात पत्रकार वारिशेंसाठी उद्या शोकसभा

चिपळूण ः कुणबी समाजातील निर्भिड पत्रकार, कष्टकरी शेतकरीवर्गाच्या प्रश्नांना वाचा फोडणारे (कै.) शशिकांत वारिशे यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात येणार आहे. शनिवारी (ता. १८) सकाळी ११ वा. येथील कुणबी शिक्षण मंडळ संचालित (कै.) माधवराव बाईत विद्यार्थी वसतिगृहाच्या सभागृहात बैठक होईल, अशी माहिती कुणबी समाजातर्फे देण्यात आली. जिल्ह्यातील कुणबी समाजाच्या सर्व सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते, राजकीय पक्षात काम करणारे कुणबी समाजाचे नेते, कार्यकर्ते, जिल्ह्यातील सर्व क्षेत्रातील आजी-माजी अधिकारी, कर्मचारी, शिक्षकवर्ग, सामाजिक क्षेत्रात काम करणारे समाजबांधव सहभागी होतील. सभेसाठी सर्वांनी उपस्थित राहावे, असे आवाहन दादा बैठकर, सुरेश भायजे यांनी केले आहे.

--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com