
संत सेवालाल महाराजांच्या शिकवणुकीप्रमाणे वाटचाल करा
rat१६२२.txt
बातमी क्र..२२ (टुडे पान २ साठी)
फोटो ओळी
-rat१६p१४.jpg ः
राजापूर ः संत सेवालाल महाराज जयंती कार्यक्रमात दीपप्रज्वलन करताना माजी नगराध्यक्ष हनिफ काझी.
------------
राजापुरात संत सेवालाल महाराज जयंती
राजापूर, ता. १६ ः संत सेवालाल महाराज हे भारतीय सामाजिक, धार्मिक क्षेत्रातील एक सुधारक होते. त्यांनी बंजारा समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या शिकवणुकीप्रमाणे वाटचाल करून आपली सामाजिक उन्नती साधण्याचा प्रयत्न कष्टकरी बंजारा समाजबांधवांनी केला पाहिजे, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी येथे केले.
येथील बंजारा बहुउद्देशीय समाजसेवा संघातर्फे जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यशोदीन सृष्टी सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला शिवसेना तालुकाप्रमुख कमलाकर कदम, माजी नगराध्यक्षा कल्याणी रहाटे, ओबीसी संघर्ष समितीचे तालुकाध्यक्ष महेश शिवलकर, बंजारा बहुउद्देशीय समाजसेवा संघाचे अध्यक्ष धनसिंग चव्हाण आदी उपस्थित होते.
महेश शिवलकर यांनी बंजारा समाजाचे तालुक्याच्या विकासात मोलाचे योगदान असल्याचे सांगून बंजारा समाजबांधवांनी मतभेद विसरून एकजूट राखणे हीच खरी संत सेवालाल महाराजांना आदरांजली ठरेल, असे सांगितले. यानिमित्ताने संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेची जकातनाका ते यशोदीन सृष्टी सभागृह अशी मिरवणूक काढण्यात आली.